AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कांटे की टक्कर, पाहा कोणाची काय आहे जमेची बाजू?

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन नावांमध्ये कांटे की टक्कर आहे. सर्वच पक्षाने अजून उमेदवार जाहीर केलेले नसले तरी देखील भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होईल अशी चर्चा आहे. पुण्यात कुणाची ताकद अधिक आहे. जाणून घ्या.

पुण्यात कांटे की टक्कर, पाहा कोणाची काय आहे जमेची बाजू?
| Updated on: Apr 01, 2024 | 9:42 PM
Share

PUNE : काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरुन त्यांना ट्रोल करणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. धंगेकरांनी यामागे भाजपकडे बोट दाखवलंय तर पुणे भाजपच्या नेत्यांनी त्या पोस्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय. सध्या पुणे लोकसभेत भाजपकडून धंगेकरांच्या ट्रोलिंगसाठी वापरल्याचा आरोप होतोय. मविआचा अशिक्षित उमेदवार, रविंद्र धंगेकर फक्त आठवी पास, पुणे शिक्षणाचे माहेरघर…पण पुण्याचा उमेदवारच अशिक्षित…. असं या पोस्टरमध्ये म्हटले आहे. यावरुन भाजपनं आपलं शिक्षण काढलं असलं तरी जनतेच्या कामात माझी पीएचडी असल्याचं उत्तर काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांनी दिलंय. तर सोशल मीडियावरच्या या प्रचारावर भाजप नेत्यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

कसपा पोटनिवडणुकीवेळी प्रतिस्पर्ध्यांकडून नकारात्मक प्रचार धंगेकरांच्या फायद्याचा ठरला होता. त्यावेळी ‘हू इज धंगेकर” हा चंद्रकांत पाटलांच्या प्रश्न भाजपवरच बूमरँग झालेला आहे. दरम्यान भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर पुणे लोकसभेत मैदानात आहेत. मोहोळ चार वेळा नगरसेवक, पुण्याचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर परिषदेचे उपाध्यक्ष अशा पदांवर मोहोळ राहिले आहेत.

पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे संचालक, याशिवाय पीएमपीएमएलचे संचालक राहिले आहेत. 2009 ला खडकवासलातून उमेदवार होते. सामान्य जनता ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे चांगले संबंध त्यांची जमेची बाजू आहे.

दुसरीकडे धंगेकरदेखील ४ वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांची राजकीय सुरुवात शिवसेना आणि मनसेतून झाली. 2009 ला कसब्यात बापटांविरोधात धंगेकरांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. गेल्यावर्षी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसब्यातून ते आमदार झाले.

दांडगा जनसंपर्क, २४ तास फोनवर उपलब्ध असणारा नेता ही रविंद्र धंगेकरांची जमेची बाजू आहे. कसबा विजयात काँग्रेसबरोबरच स्वतः धंगेकरांच्या जनसंपर्काचाही वाटा मोठा होता. त्यामुळे आता पुणेकर मतदार कोणाला संधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.