पुणेकरांसाठी खुशखबर ! म्हाडाच्या 2 हजार 823 सदनिकांच्या नोंदणीस आजपासून सुरुवात

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) अंतर्गत पुणे आणि पिपरी-चिंचवड मधील २ हजार ८२३ सदनिकांसाठी २० टक्के सर्वसमावेशक योजनेंर्तगत सोडत काढण्यात  आली आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर ! म्हाडाच्या 2 हजार 823 सदनिकांच्या नोंदणीस आजपासून सुरुवात
mhada ,pune
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 5:32 PM

पुणे- पुणेकरांना असणारी घराची चिंता आता लवकरच मिटणार आहे.  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.  पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

म्हाडा अंतर्गत पुणे आणि पिपरी-चिंचवड मधील 2 हजार 823 सदनिकांसाठी 20टक्के सर्वसमावेशक योजनेंर्तगत 1हजार 399 सदनिका अश्या एकूण 4 हजार 222 सदनिका  असणार आहेत.

या परिसरात असणार सदनिका

म्हाडा अंतर्गत काढण्यात आलेल्या सदनिकांचा समावेश या परिसरात असणार आहे. यात पुण्यातील येवलेवाडी , मोहम्मदवाडी , कोथरूड ,आंबेगाव बुद्रुक, धानोरी, लोहगाव , वाघोली फुरसुंगी खराडी घोरपडी या परिसरात असतील. तर पिंपरी चिंचवडमधील दिघी, चऱ्होली , चिखली , किवळे, मोशी , पुनावळे , वाकड, चाकण , पिंपरी, रावेत , वाघिरे , बोऱ्हाडेवाडी, ताथवडे, चोविसागाव , थेरगाव , डुडुळगाव येथे असणार आहेत.

असा करा अर्ज 16 नोव्हेंबर,  सकाळी 9 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीची व अर्जास सुरुवात .

16डिसेंबर 2021  पर्यंत सायंकाळी 5  वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत.

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17  नोव्हेंबर रात्री 11 वाजून59 मिनिटांपपर्यंत असणार आहे.

ऑनलाईन पेमेंट स्वीकृती दि. 17 डिसेंबर 2021  रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.

बँकेत आरटीजीएस / एनएफएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिवस 20 डिसेंबर 2021  (बँकेच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे ) असणारा आहे.

यावेळी होणार सोडत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादी 28 डिसेंबर2021 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहे.

सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादीची प्रसिद्धी 4 जानेवारी 2022  रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

अंतिम सोडत 7 जानेवारी 2022 रोजी , पुणे ,म्हाडा कार्यालय येथे होईल.

सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीतील अर्जाची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर 7 जानेवारी 2022 ला सायंकाळी 7वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा

VIDEO: उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.