आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार, मध्यरात्री घुसून दोघांनी काय केले?
Pune MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारुन आता पंधरा दिवस झाले. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत पक्षाची भूमिका रोहित पवार यांनी आक्रमकपणे मांडली आहे. आता त्यांच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार घडलाय.
योगेश बोरसे, पुणे | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहे. आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवार त्यांच्या गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहे. माध्यमांबरोबर सोशल मीडियावर सुद्धा ते आक्रमक झाले आहेत. संधी मिळेल, तेव्हा भाजपलाही घेरण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहे. आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात शनिवारी मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला.
काय झाले रोहित पवार यांच्या कार्यालयात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील हडपसर परिसरात सृजन हे कार्यालय आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री दोन वाजता दोन जणांनी घुसखोरी केली. त्यांच्याकडून कार्यालयातील साहित्य पेटवण्यात आले. तसेच कार्यालयाला काळे फासण्याचाही प्रयत्न करण्यात आला. रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला का? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. दरम्यान या घटनेबाबत रोहित पवार यांच्याकडून अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.
पोलिसांकडून पंचनामा
रोहित पवार यांच्या पुण्यातील ऑफिसमधील साहित्य जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.
रोहित पवार यांचे ते ट्विट चर्चेत
आमदार रोहित पवार यांनी लोणावळा येथील एक फोटो शुक्रवारी ट्विट केला. त्या टि्वटच्या माध्यमातून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्षानेही राजकारणासाठी चुकीचा मार्ग निवडला असल्याचे त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्या ट्विटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी रोहित पवार यांना ट्रोलही केले होते.
हे ही वाचा
एक फोटो ट्विट करत रोहित पवार यांच्या निशाण्यावर आले तिघे, भाजप, शिंदे गट अन् अजित पवार