राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक इच्छूक, आता मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्याने व्यक्त केली इच्छा

Sangali News : राज्यात काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. आता ठिकठिकाणी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागत आहेत. या चर्चांमध्ये मोदी मंत्रिमंडळातील एका नेत्याने आपली इच्छा प्रकट केली.

राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक इच्छूक, आता मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्याने व्यक्त केली इच्छा
chief minister of maharashtraImage Credit source: tv9 network
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 12:16 PM

सांगली : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अनेक ठिकाणी अजितदादा भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागत आहेत. अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यास सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही बॅनर्स आहेत. त्याआधी सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री असे बॅनर पुणे, मुंबईत लागले होते. यामुळे राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीची यादी वाढत चालली आहे. आता मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्र्यानेही आपण मुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

कोणी केली इच्छा व्यक्त

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी सांगलीत म्हटलं आहे. सांगली येथे पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, कुणाकडे बहुमत असेल तरच हे शक्य आहे. याबाबत चर्चाही खूप होत आहे. मला सांगायचे आहे की, मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या शिंदे यांचे काम चांगले

रामदास आठवले म्हणाले की, मी नक्कीच मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. मात्र सध्या आमचे सरकार स्थिर असून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. ते दिवसाचे 16 ते 18 तास काम करत आहेत. ते कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. आम्हाला अजितदादांची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात चढा-ओढ सुरू आहे, पण जो पर्यंत एकनाथ शिंदे आहेत, तो पर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

उद्धव यांनी सांभाळून बोलावे

उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या जहरी टीकेवर बोलताना मंत्री आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे हे आपले मित्र आहेत. तसेच ठाकरे सुसंस्कृत देखील आहेत. पण त्यांनी बोलताना सांभाळून बोलावे, असा सल्ला मी त्यांना देईल.

देवेंद्र  फडणवीस काय म्हणाले होते

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मुख्यमंत्री होणे ही प्रत्येकाची इच्छा असते पण कधी कधी ती पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपात येणार या चर्चाना काही अर्थ नाही. आत्याबाईला मिशा असत्या तर… मावशीला दाढी असती तर… अशा गोष्टीचे उत्तर नसते. त्यामुळे ते भाजपात येणार का यालाही उत्तर नाही असेच असल्याचे त्यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.