AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कोटींची धाडसी लूट, पोलिसांनी लावला केवळ आठ तासात छडा

सांगलीमधील तासगावमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटली गेली होती. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे ही लूट करण्यात आली होती. या लुटीचा तपास सांगली पोलिसांनी करत अवघ्या आठ तासांमध्ये आरोपींना जेरबंद केले आहे.

एक कोटींची धाडसी लूट, पोलिसांनी लावला केवळ आठ तासात छडा
| Updated on: Mar 30, 2023 | 1:12 PM
Share

सांगली : एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी लूट करण्याचा प्रकार सांगलीत मंगळवारी रात्री घडला होता. ज्या प्रमाणे चित्रपटात चोरटे एखाद्या उद्योजकाचा किंवा व्यापाऱ्याचा पाठलाग करतात. त्यानंतर रस्त्यावर संधी साधून त्यांची गाडी आडवतात. अन् काही समजण्यापूर्वी गाडीतील कोट्यवधी रुपयांची लूट करतात तसाच प्रकार घडला. परंतु पुढे पोलिसांनी बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे कामगिरी केली. अवघ्या आठ तासात आरोपींना जेरबंद केले. अर्थात त्यांच्यांकडून सर्व रोकडही जप्त केली आहे.

काय घडले होते

सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटल्याचा प्रकार घडला होता. या लुटीचा अखेर सांगली पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्ये छडा लावला. या प्रकरणी तीन जणांना अटक करत त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी व त्यांच्या चालकाला मारहाण करत अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता. केवलानी यांच्यांकडे असलेली सुमारे 1 कोटी 10 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता.

शेतकऱ्यांसाठी आणले पैसे

केवलानी हे द्राक्ष व्यापारी आहेत. द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1 कोटी 10 लाखांचा रक्कम घेऊन ते आले होते. यावेळी त्यांची ही रक्कम लुटली होती. या घटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके देखील नेमली होती. पोलिसांनी सांगली जिल्ह्यामध्ये नाकाबंदी केली होती.

दरम्यान तासगाव तालुक्यातील याच मनेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकडे आढळून आली. तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटल्याचा सांगितले. यावेळी त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले आहे. नितीन यलमार (वय 22),विकास पाटील (वय 32) आणि अजित पाटील (वय 22) असे तिघा संशयितींची नावे आहेत.

बॉलीवूड चित्रपटाच्या स्टाईलने व्यापाऱ्याकडून एक कोटीची लूट…वाचा सविस्तर

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.