मुंबईत 72 व्या मजल्यावर कोणासाठी फ्लॅट घेतला? संजय शिरसाट यांना कोणी विचारला रोखठोक सवाल

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यांवर केलेल्या विधानावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय शिरसाट हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे, जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्याने केलाय.

मुंबईत 72 व्या मजल्यावर कोणासाठी फ्लॅट घेतला? संजय शिरसाट यांना कोणी विचारला रोखठोक सवाल
संजय शिरसाट
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 11:43 AM

प्रदीप कापसे, पुणे : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर शिरसाट यांच्यांवर चौफेर टीका होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संजय शिरसाट यांच्यांवर टीकेचा भडीमार केलाय. संजय शिरसाट हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहेस जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते.मुंबईत 72 व्या मजल्यावर कोणासाठी फ्लॅट घेतला? असा प्रश्न त्यांनी शिरसाट यांना विचारला आहेत.

काय म्हणाल्या रुपाली पाटील

हे सुद्धा वाचा

रुपाली पाटील म्हणाल्या की, सुषमाताई प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ, दादा अशी संबोधने लावतात. कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत संस्कार दिसतात. ज्याची सध्या पातळी घसरलेल्या राजकारणात वाणवा आहे.

याउलट संजय शिरसाट आत्ता जिथे आहेत तिथे असणारे पुरुष राजकारणी हे कायम महिलांबद्दल अत्यंत असभ्य भाषेत बोलतात. मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील .या नेत्यांकडून गलिच्छ भाषा आणि शब्दप्रयोग केला जातो. त्यामुळे शिरसाट यांना चांगलं बोलायची आणि चांगलं ऐकायची मुळात सवयच नाही.

शिरसाट यांना रुपाली पाटील यांनी विचारले प्रश्न

१) संभाजीनगरमध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला संजय शिरसाट का बर अडकवू पाहत होते ? या पाटीलचा काय संबंध होता म्हणून संजय शिरसाट हे आपली सगळी ताकद पणाला लावत होते?

२) व्हाया सुरत गुवाहाटी टूर करणाऱ्या संजय शिरसाटांकडे 72 कोटी रुपयांची रक्कम घरी कशी काय आली ? या ७२ कोटी रुपयांतून शिरसाट यांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी त्यांच्या जीवाभावाची बाई कोण होती?

3) अगदी आठच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये ७२व्या मजल्यावर संजय शिरसाटांनी कुणासाठी कोट्यावधीचा फ्लॅट घेतला ज्याची त्यांनी सत्यनारायण पूजा करण्यासाठी काही पत्रकारांनाही आमंत्रित केले होते.

4) दोन अडीच महिन्यांपूर्वी संजय शिरसाट यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने एअर ॲम्बुलन्सने संभाजीनगरवरून मुंबईला नेण्याचे फार मोठे नाटक झाले. हे अटॅक प्रकरण नेमके काय होते ?

काय म्हणाले होते शिरसाट?

आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असा टोला त्यांनी लगावला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.