AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन ठाकूर यांना मंत्रालयातून मदत?

Lalit Patil | पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात ललित पाटील यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा मोठा आरोप केला आहे. ललित पाटील याला मंत्रालयातून मदत झाल्याचे म्हटले आहे.

ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन ठाकूर यांना मंत्रालयातून मदत?
Lalit Patil
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 2:56 PM

प्रदीप कापसे, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. त्यानंतर ससून रुग्णालयातून तो फरार झाला. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. पोलीस आणि ससून रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भवऱ्यात आले. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याला पंधरा दिवसांनी अटक झाली. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी झाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स जप्त केले. या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सातत्याने आरोप करत आहेत. आता ललित पाटील याला मंत्रालयातून मदत झाल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

ललित पाटील याने कोट्यवधी रुपये वाटले

ललित पाटील याने 9 महिन्यांत कोट्यावधी रुपये वाटले आहे. आजारपणाचे नाटक करुन तो ससून रुग्णालयात राहिला. त्याला ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि पोलिसांनी मदत केली. या काळात ललित पाटील याला पंचताराकीत सुविधा दिल्या गेल्या. त्यासाठी त्याने कोट्यवधी रुपये वाटले, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. त्यामुळे संजीव ठाकूर यांची नार्को चाचणी केली पाहिजे. त्यातून सत्य बाहेर येईल. केवळ त्यांची बदली करुन काही होणार नाही, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

संजीव ठाकूर यांना मंत्रालयातून मदत

संजीव ठाकूर यांना मंत्रालयातून मदत करण्यात आली. त्याची मंत्र्याशी ओळख आहे. यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर आणावे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच संजीव ठाकूर याच्यावर पोलीस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ठाकूर यांना सोलापूरवरुन पुण्यात आणले. हे भाजपने त्याचे केलेले पुर्नवसन होते. यामुळे संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट केली पाहीजे. त्यावेळी ललित पाटील याची नार्को टेस्ट केली पाहीजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...