बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचा मद्याच्या नशेत धिंगाणा, महिला पोलिसांना मारहाण पण गुन्हाच दाखल नाही

Pune News | पुणे शहरातील वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घटना घडली. मद्याच्या नशेत असलेल्या तरुणीने धिंगाणा घातला. या तरुणीने सोसायटीचे गेट बंद करुन रहिवाशी अन् पोलिसांनाही मारहण केली. परंतु गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचा मद्याच्या नशेत धिंगाणा, महिला पोलिसांना मारहाण पण गुन्हाच दाखल नाही
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 11:17 AM

रणजित जाधव, पुणे, दि. 2 जानेवारी 2024 | सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत राज्यात सर्वत्र झाले. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात मद्यप्राशन करुन तरुणीने धिंगाना केला. पुणे शहरातील वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. मद्याच्या नशेच्या अमलाखाली असलेल्या या तरुणीने सोसायटीचे गेट बंद केले. सोसायटीतून कोणाला बाहेर जाऊ दिले नाही. बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांना ती मारहाण करु लागली. शिविगाळ करत तिने प्रचंड उपद्रव केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

महिला पोलिसांनाही मारहाण

पुण्यामधील मद्यधुंद तरुणीच्या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशी वैतागले. तिला समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती ऐकण्यास तयार नव्हती. यामुळे सोसायटीतील रहिवाश्यांनी पोलिसांना बोलावले. परंतु तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतले. तसेच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केली, असे रहिवाशांनी सांगितले. संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने तिला लगेच सोडून देण्यात आलं असं सोसायटीतील रहिवाशांच म्हणणे आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असताना तिने महिला पोलिसांना मारहाण केली तरी गुन्हा दाखल झाला नाही.

हे सुद्धा वाचा

पुणे ओळख हरवू लागलेय…

पुणे शहर शिक्षणाचे आणि संस्कृतिचे माहेर आहे. परंतु आपली संस्कृती पुण्यातून हरवत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. पुण्यात अमली पदार्थांचे रॅकेट अनेक वेळा समोर आले आहे. पुण्यात रेव्ह पार्टीचे प्रकार घडले आहे. यामुळे पुणे आपली ओळख हरवत असल्याची चिंता पुणेकरांना लागली आहे. पोलीस अधिकाऱ्यांची मुले नियम मोडत असल्यास त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु सर्वसामान्य व्यक्तीस किरकोळ प्रकरणातही पोलिसांकडून पोलीस धाक दाखवला जातो. यामुळे कायदा सर्वांना सारखा असतो, हे पुन्हा दाखवून देण्याची गरज आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.