‘शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं’, देशाला कोरोनाची लस देणाऱ्या सायरस पुनावाला यांचं मोठं वक्तव्य

देशाला कोरोनाची लस देणारे सायरस पुनावाला यांनी शरद पवार यांच्याबद्दल सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शरद पवार यांना थेट राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

'शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं',  देशाला कोरोनाची लस देणाऱ्या सायरस पुनावाला यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 8:21 PM

पुणे | 30 ऑगस्ट 2023 : कोरोना संकट काळात ज्यांनी संजीवनी सारखं औषधाची निर्मिती केली अशा सीरम इन्सिट्यूचे सर्वेसर्वा (सीरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर) सायरस पुनावाला यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांचं वयावरुन सातत्याने चर्चा होते. ते सध्या 82 वर्षांचे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांनीदेखील शरद पवार यांना आता निवृत्त व्हा, असं वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडलेली आहे. असं असताना शरद पवार यांनी हार मानलेली नाही.

शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या सभांमधून ते भाजपवर सडकून टीका करत आहेत. याशिवाय ते अजित पवार गटावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधतल आहेत. शरद पवार हे पुन्हा एकदा पक्षबांधणीला लागले आहेत. त्यांच्याकडून नुकत्याच नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय त्यांनी अनेकांवर नवी जबाबदारी दिली आहे.

शरद पवार हे जोमाने कामाला लागले आहेत. ते इंडिया आघाडीच्या बैठकीतही प्रमुख घटक आहेत. त्यांच्या भूमिकेला आणि मार्गदर्शनाला इंडिया आघाडीतल जास्त महत्त्व आहे. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीलादेखील शरद पवार हजर होते. त्यामुळे शरद पवार भाजपविरोधात लढण्यासाठी जंगजंग पछाडताना दिसत आहेत. असं असताना सायरस पुनावाला यांनी शरद पवार यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.

सायरस पुनावाला नेमकं काय म्हणाले?

“माझं शरद पवारांना म्हणणं आहे की, त्यांना देशाचा पंतप्रधान होण्याची दोनवेळा संधी होती. पण त्यांनी ती संधी घालवली. कारण ते खूप फार हुशार आहेत. ते देशाची फार सेवा करु शकले असते. पण त्यांची संधी गेली. याबाबत मला जास्त वाटतं. आता त्यांचं वय झालं आहे. त्यांनी आता रिटायर व्हावं”, असं वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केलंय.

दरम्यान, सायरस पुनावाला यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस आणणार असल्याची घोषणा केली. डेंग्यू आजार सध्या देशभरात पसरला आहे. डेंग्यूवरील लस वर्षभरात मार्केटमध्ये आणणार, सायरस पुनावाला यांनी सांगितलं आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.