पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 नायजेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. 4 महिला या तरुणींचा ग्राहकांना पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:49 AM

पिंपरी-चिंचवड : शहरातील पिंपळे गुरव परिसरात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या भागातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 नायजेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. 4 महिला या तरुणींचा ग्राहकांना पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कारवाईबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी माहिती दिली आहे. संबंधित महिला आणि तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.(Sex racket in Pimpri-Chinchwad, 16 Nigerian girls in police custody)

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठल कुबडे ,सहय्य्क पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे आणि सहकारी यांनी हि कारवाई केली आहे.

हिंजवडीत ऑनलाईन सेक्स रॅकेट उघड

चार दिवसांपूर्वीच हिंजवडी परिसरातही एक ऑनलाईन सेक्स रॅकेट समोर आलं होतं. ऑनलाईन माधम्यातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी 13 तरुणींची सुटका केली होती, तर एकाला अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी एका वेबसाईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी फोन क्रमांक ग्राहकांना पुरवत होते. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना मुलींचे फोटो पाठवले जात. त्यातून ग्राहकाने मुलगी निवडल्यानंतर त्यांना पाहिज्या त्या ठिकाणी मुलीला पाठवलं जात होतं. त्या बदल्यात संबंधित ग्राहकाकडून तब्बल 8 ते 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम घेतली जात होती. या सेक्स रॅकेटची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाल्यानंतर सोशल मीडियाचा वापर करुन बनावट ग्राहक आरोपीकडे पाठवण्यात आले. त्यातून पोलिसांनी 13 तरुणींची सुटका करत एकाला अटक केली आहे. आरोपीकडून एक मोटार आणि मोबाईल फोन असा एकूण 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

3 लॉजवर छापा, 8 अटकेत

पिंपरीमधीलच धावडे वस्ती इथल्या 3 लॉजवर छापा टाकून पोलिसांनी 8 जणांना डिसेंबरमध्ये अटक केली होती. या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु होता. महिलांना पैशाचं आमिष दाखवून या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

सांगलीत हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलीस निरीक्षकालाच बेड्या, दोघींची सुटका

Sex racket in Pimpri-Chinchwad, 16 Nigerian girls in police custody

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.