‘सेक्सटॉर्शन’चा धंदा, तरुणाच्या आत्महत्येनंतर पुणे पोलिसांनी थेट राजस्थानातून आवळल्या मुसक्या

पुणे शहरातील एका तरुणाला व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्या तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.

‘सेक्सटॉर्शन’चा धंदा, तरुणाच्या आत्महत्येनंतर पुणे पोलिसांनी थेट राजस्थानातून आवळल्या मुसक्या
crime newsImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 11:13 AM

पुणे : मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन अश्लील गोष्टी आणि उद्योग करायचे, त्यानंतर चित्रफीत तयार करुन प्रसारीत करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याच्या धंद्यात (सेक्सटर्शन) अनेक तरुण फसत आहे. हा धंदा राजस्थानातील काही गावांमध्ये सुरु आहे. या गावांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा उद्योग केला जात असल्याने ही मंडळी पोलिसांच्या जाळ्यात येत नाही. यामुळे त्यांच्यांवर अंकुश लावता येत नाही. परंतु आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरातील एका तरुणाला व्हॉटसअ‍ॅप व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्या तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. या प्रकारात सहकारनगरमधील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी सतत आठ दिवस-रात्र रेकी केली. त्यानंतर राजस्थानमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन राजस्थानमधील भरतपूर परिसरातील रायपूर सुकेती गाव गाठले. या गावातून एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली. सेक्सटॉर्शनच्या धंद्यात रायपूर सुकेतीमधील आणखी काही सामील असल्याचा संशय पोलिसांनी आहे. या व्यक्तीने महिलेचा व्हॉटसअ‍ॅप डिपी असलेल्या मोबाईलवरून पुणे शहरातील एका तरुणाला व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल केला. आरोपीने अश्लील चॅटिंगमध्ये गुंतवून त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला.हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी त्या तरुणाला दिली.

हे सुद्धा वाचा

तरुण घाबरला पैसे पाठवले ‘सेक्सटॉर्शन’चा धंद्याला बळी पडलेला पुणे शहरातील तरुण धमकीनंतर घाबरला. बदनामी होईल म्हणून त्याने‘फोन पे’वर पैसे पाठवले. त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे तरुणाने ‘मैं सुसाईड कर रहा हूं’ असा मेसेज पाठवला. तरीही आरोपीने ‘करो मैं व्हिडिओ ऑनलाइन करता हूं’ असे म्हणून सतत पैशांची मागणी करणे सोडले नाही. त्यामुळे त्या तरुणाने आत्महत्या केली.

पोलिसांनी केले तांत्रिक विश्लेषण

तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्याचा मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर सहकारनगर पोलिसांचे एक पथक राजस्थान येथील सुकेती गावात गेले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग आठ दिवस-रात्र रेकी करुन आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय ? मोबाईलवर अनोळखी तरुणी मैत्रीची विनंती पाठवतात. आकर्षक फोटो टाकलेल्या त्या तरुणींच्या विनंतीला अनेक तरुण प्रतिसाद देतात. त्यानंतर जाळ्यात ओढून तरुणांचे आक्षेपार्ह अवस्थेतील स्क्रीनशॉट व रेकॉर्डींग आरोपी मोबाइलवर काढतात. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली जाते. या गु्न्ह्यांना सेक्सटॉर्शन म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.