शरद पवार यांना किती टक्के मार्क मिळायचे, विद्यार्थ्यांसमोरच केला खुलासा

माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर क्रिकेटचा प्रवास सुरु झाला.

शरद पवार यांना किती टक्के मार्क मिळायचे, विद्यार्थ्यांसमोरच केला खुलासा
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 7:07 AM

नविद पठाण, बारामती : मी कधी नापास झालो नाही…पण ३५ टक्क्यांच्या पुढेही गेलो नाही… नेहमी मार्ग काढण्याची मानसिकता ठेवली…संकटातून मार्ग काढण्याची मानसिकता असली की अपयश येत नाही...यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कष्ट करा… पण कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका… फार चांगले गुण मिळाले तो विद्यार्थी यशस्वी होतो, असे नाही… ३५ % गुण मिळवणारा विद्यार्थीही यश मिळवतो हे मी अनुभवले आहे…म्हणून मेहनत करा, पण मार्क पाहू नका,  असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलू उघड केले.

क्रिकेटमध्ये कसे गेले

हे सुद्धा वाचा

क्रिकेटमध्ये कसे गेले, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो. त्यावेळी क्लबमध्ये काहीवाद होते.ते मिटत नव्हते.

मी हे वाद मिटवायचा प्रयत्न केला. गरवारे क्लबनंतर मुंबई क्रिकेटची निवडणूक लढवली. पुढे जाऊन भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर मी क्रिकेटचा राजीनामा दिला. तेव्हापासून परत तिकडे पाहिले नाही.

सामान्य माणूस महत्वाचा

आपली सर्वात चांगली उपलब्धी कोणती? त्यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, मी सतत सामान्य माणसाशी संवाद साधतो. त्यांच्यात माझा वावर असतो.

महत्वाचे निर्णय घेताना सामान्य माणसांकडून शिकायला मिळते. कारण ते राजकारण्यांपेक्षा शहाणे असतात. सामान्य माणसाच्या शहाणपणावर विश्वास ठेवला तर अपयश येणार नाही. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील सामान्य माणसाचा शहाणपणा लक्षात घ्या. तुम्ही मागे राहणार नाही.

साताऱ्यातील सभा

शरद पवार यांनी पावसातली सभेची आठवण सांगितली. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी साताऱ्यात ही सभा झाली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या सभेचं श्रेय माझ्याकडे नाही. मी बोलायला उभं राहिलो पाऊस आला. मला वाटलं आता सभा संपली.

पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांना ऐकायचंय. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकलं. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला. त्या सभेचा व्हिडिओ सर्वत्र फिरले. राज्यभरातून त्याचे कौतुक झाले. ती सभा ऐतिहासिक ठरली होती.

हिंजवडीत होणार होता साखर कारखाना, पण कसा झाला आयटी पार्क, पवार यांनी सांगितला इतिहास

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.