शरद पवार यांनी जेथून निवडणूक लढवली, त्यावर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा दावा

lok sabha Election 2024 | शरद पवार आणि अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याच नव्हे तर सातारा आणि सोलापूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. माढा मतदारसंघात मी निवडणूक लढवली होती. हा मतदार संघ मला चांगला ठावूक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी जेथून निवडणूक लढवली, त्यावर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा दावा
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 10:53 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पवार कुटुंबियांच्या पुणे जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याच नव्हे तर सातारा आणि सोलापूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या ठिकाणांवरुन शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती, त्या माढा मतदार संघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे. शरद पवार गट माढा लोकसभेची जागा लढवणार असल्याचे शरद पवार यांच्याकडून स्पष्ट संकेत दिले आहे.

माढा लोकसभेचे गणित

माढा लोकसभेत शरद पवार यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ५,३०,५९६ मते घेऊन विजय मिळवला होता. भाजप उमेदवार सुभाष सुरेशचंद्र देशमुख आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा त्यांनी पराभव केला होता. २०२४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. २०१९ मध्ये भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर विजयी झाले होते. म्हणजे २०१९ मध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादीकडून भाजपकडे आला. आता पुन्हा शरद पवार त्यावर पकड बसवणार आहे. माढा लोकसभा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील चार मतदार संघ आहेत. त्यात करमाळा विधानसभा मतदारसंघ, माढा विधानसभा मतदारसंघ, सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघ आहे. सातारामधील फलटण विधानसभा मतदारसंघ आणि माण विधानसभा मतदारसंघ आहे.

काय म्हणाले शरद पवार

माढा मतदारसंघात मी निवडणूक लढवली होती. हा मतदार संघ मला चांगला ठावूक आहे. तुम्ही सगळ्यांनी काम केले तर त्या मतदारसंघात अनुकूल निकाल घेवू, असे शरद पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गट लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

पक्ष पुन्हा उभा राहील

राजकारणात पक्ष उभे राहतात. काही जण पक्ष सोडून जातात. काही जण नव्याने पक्षात येतात. हे चालतच असते. देशात पहिल्यांदा असे घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून आहे, अस वाटत नाही. यामुळे आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. त्याचा निकाल लवकरच लागेल. चिन्हाची काळजी करायची गरज नाही. मी आतापर्यंत १४ निवडणूक लढलो ५ निवडणुकीत चिन्ह वेगळे होते.

हे ही वाचा

सुनेत्रा पवार यांचा पैठणीचा खेळ अन् अजित पवार यांच्यावर असा घेतला उखाणा Video

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.