पालिका निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव, ‘इथल्या लोकांनी 6 वेळा निवडून दिलं’ म्हणत भावनिक साद

शरद पवार यांनी आज (16 ऑक्टोबर) बोलताना पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना भावनिक साद घातली. यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा मला लोकसभेत पाठवलं, असं भावनिक वक्तव्य केलं.

पालिका निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव, 'इथल्या लोकांनी 6 वेळा निवडून दिलं' म्हणत भावनिक साद
SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 4:57 PM

पुणे : राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्यात आगामी काळात लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या रणांगणात खुद्द शरद पवारदेखील उतरल्याचं दिसतंय. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी पवार यांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पुणे येथील बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यांनी आज (16 ऑक्टोबर) बोलताना पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना भावनिक साद घातली. यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं, असं भावनिक वक्तव्य केलं.

येथील नागरिकांनी सहा वेळा लोकसभेत पाठवलं 

शरद पवार आज पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड तसेच पुण्यावर बोलताना भावनिक भाष्य केलं. “यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. येथील नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं. यापूर्वी या ठिकाणी माझं जास्त जाणं-येणं असायचं पण आता जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. त्यामुळे येणं-जाणं कमी झालं आहे,” असे भावनिक उद्गार शरद पवार यांनी काढले.

निकालानंतर काय ते समजेल

दरम्यान, पुणे महानगपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. येथे आमचीच एकहाती सत्ता येणार असा दावा प्रत्येक पक्ष करत आहे. तर प्रत्यक्ष निकालच विरोधकांना उत्तर देईल असे भाजप नेते सांगताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पुण्याचा महापौर फक्त शिवसेनेचाच होईल असं भाष्य केलं होतं. तर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला होता. इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली हे राऊतांना माहिती आहे. राऊत माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. पण निवडणुकीनंतर संजय राऊतांना काय ते कळेल, असे गिरिश बापट म्हणाले होते.

इतर बातम्या :

‘आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी पेट्रोल डिझेल महागच,’ मोदी सरकार शरद पवारांच्या निशाण्यावर

3 हजार कोटी दिले नाहीत म्हणून कोळश्याचा पुरवठा थांबवला, मग राज्याचे जीएसटीचे 35 हजार कोटी कसे थांबवता?; शरद पवारांचा केंद्राला सवाल

रुम साफ करण्याचे हजार रुपये देतो सांगत हॉटेलमध्ये नेलं, नंतर सहा नराधमांकडून संतापजनक कृत्य

(sharad pawar comment on pune pimpri chinchwad municipal corporation electionsaid people elected me for six times)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.