AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar | 1980 मधील शेतकरी दिंडीनंतर शरद पवार राष्ट्रीय राजकारणात आता रोहित पवार यांची संघर्ष यात्रा

Shard Pawar and Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते अजित पवार आता शरद पवार यांच्यासोबत नाही. आता त्यांची जागा घेण्यासाठी शरद पवार रोहित पवार यांना तयार करत आहेत. रोहित पवार यांची संघर्ष यात्रा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल आहे का?

Rohit Pawar | 1980 मधील शेतकरी दिंडीनंतर शरद पवार राष्ट्रीय राजकारणात आता रोहित पवार यांची संघर्ष यात्रा
sharad pawar rohit pawarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 09, 2023 | 4:15 PM
Share

पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची साथ अजित पवार यांनी सोडली. परंतु त्यांचा नातू रोहित पवार हे या काळात शरद पवार यांच्यासोबत सावली प्रमाणे होते. यामुळे शरद पवार यांनी रोहित पवार यांना राजकारणातील राजकीय क्षितिजावर उदय करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रोहित पवार हे शरद पवार यांच्या 1980 मधील शेतकरी दिंडीप्रमाणे युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून राज्यभर फिरणार आहेत.

कशासाठी होती शरद पवार यांची शेतकरी दिंडी

शरद पवार यांची शेतकरी दिंडी 1980 मध्ये जळगाव ते नागपूर निघाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही दिंडी होती. या दिंडीतून शरद पवार यांचा उदय राष्ट्रीय राजकारणात झाला. त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक दिसली. जळगाव ते नागपूर अशी 480 किलोमीटरच्या या दिंडीतून शरद पवार यांनी आपली ताकद दाखवून दिली. 7 डिसेंबर 1980 रोजी जळगावातून ही दिंडी सुरु झाली होती. नागपूर अधिवेशनापर्यंत पोहचण्यापूर्वीच ही यात्रा बरखास्त करण्याची तयारी तत्कालीन अंतुले सरकारने केली होती. मात्र शरद पवार यांनी शेतकऱ्यांना गनिमी काव्याने रात्रीतून नागपुरात घुसवून त्यांची झोप उडवली. त्यानंतर राजीव गांधी यांनी शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घेतले.

आता रोहित पवार यांची संघर्ष यात्रा

1980 नंतर आता 2023 मध्ये शरद पवार यांचे रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.  अर्थात त्या मागे शरद पवार आहेत. एकूण 22 मुद्दे घेऊन रोहित पवार संघर्ष यात्रा काढणार आहे. त्यात युवकांचेही मुद्दे आहेत.  24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत रोहित पवार यांची ही यात्रा चालणार आहे. यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार 800 किलोमीटर प्रवास करणार आहेत. या माध्यमातून 13 जिल्ह्यात ते जाणार आहेत.

शरद पवार यांची दोन्ही वेळी सभा

रोहित पवार 24 तारखेला महात्मा फुले वाडा आणि लाल महालात जाऊन आशीर्वाद घेणार आहे. त्यानंतर पुण्यात शरद पवार यांची सभा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर अशी ही यात्रा असणार आहे. रोहित पवार रोज 18 ते 24 किमी चालणार आहे. सकाळी सहा वाजता यात्रेची सुरुवात होणार आहे.

दिवाळी त्या गावात करणार

संघर्ष यात्रे दरम्यान दिवाळीच्या दिवशी ज्या गावात रोहित पवार असतील, त्या ठिकाणीच दिवाळी साजरी करणार आहेत. त्या दिवशी रोहित पवार यांचे कुटुंबीय यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेच्या समारोपाला शरद पवार येणार आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.