‘साहेब मर्दानचा नेता आणि उद्धव ठाकरे गांXचा नेता’, रामदास कदम यांची जीभ घसरली
शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. रामदास कदम पुण्यतील शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली. रामदास कदम यांच्याविरोधात टीका करत असताना त्यांची दोनवेळा जीभ घसरली.
विनय जगताप, Tv9 मराठी, पुणे | 9 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पुण्यातील सासवड येथे आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात भाषण करताना रामदास कदम यांची जीभ घसरली. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ही टीका करत असताना रामदास कदम यांची जीभ घसरली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली. “मी मरेपर्यंत शिवसैनिकच असेल. मी मुबंईमध्ये कामाला सुरुवात केली. अनेक आंदोलनं केली. सुरुवातीला आंदोलनामुळे 2 महिने एका केसमध्ये आत गेलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना अशी घोष वाक्य होती”, असं रामदास कदम म्हणाले.
“आम्ही सुरुवात केली तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते. ते जुनिअर होते. त्यांच्या पेक्षा रामदास कदमला अनुभव नक्कीच जास्त आहे. मगाशी नीलम ताई हळूच चिमटा काढून गेल्या. कुणाला कळलं नसेल. मगाशी विषय निघाला. त्या पुरंदरच्या एअरपोर्टसाठी सगळ्यातआधी मी सुद्धा आंदोलन केलंय. कदाचित उद्धव ठाकरे यांनाही माहिती नसेल, खासदार संजय राऊत कधी आले मला माहिती नाही”, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
‘साहेब मर्दानचा नेता आणि उद्धव ठाकरे…’
“शक्य असताना बाळासाहेबांनी कधीच कुठलं पद घेतलं नाही, त्यांचं हे येडं… उद्धव ठाकरेनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अनंत गिते यांना सांगून मला जाणूनबुजून पाडलं. जेव्हा बाळासाहेबांना कळलं तेव्हा मला विधानपरिषदेवर घेतलं. माझ्या ऑफिसमध्ये आदित्य ठाकरे येऊन बसायचा. मला पहिल्यांदा भारी वाटायचं. बाळासाहेबांचा नातू येऊन बसलाय, पण नंतर शासकीय मिटिंगमध्ये येऊन बसायचा. हे कायं ते कायं, ह्याला बोलवा त्याला बोलवा. आता वडील मुख्यमंत्री, मुलगा मंत्री आणि नेता तसाच. साहेब मर्दानचा नेता आणि उद्धव ठाकरे गांXचा नेता”, असा घणाघात रामदास कदम यांनी केला.
‘उद्धव ठाकरे तू गद्दार’, रामदास कमदमांची टीका
“एखाद्याला कसं संपवायच हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं. इतिहासात नालायक मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नावं राहिलं. उद्धव ठाकरे तू गद्दार… कुणी गद्दारी केली हे तुझ्या पिल्लूच्या डोक्यावर हात ठेऊन सांग तू गद्दारी केली नाही, ते पिल्लू आदित्य कुठं कुठं फिरतंय हे सगळ्यांसमोर लवकरच येईल”, अशी टीका रामदास कमद यांनी केली.
रामदास कदम यांची एकाच भाषणात पुन्हा जीभ घसरली
रामदास कदम यांची भाषणात आणखी एकदा जीभ घसरली. त्यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका उद्धव ठाकरेंवर टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वडिलांसारखे असतील, पण बाळासाहेब लढलेना त्यांच्या विरोधात? ज्यांच्या विरोधात बाळासाहेब लढले त्या शरद पवारांसोबत हा उद्धव जाऊन बसलाय आणि सोनिया गांधीची आता हा चाटतोय…. पाय म्हणतो मी. ऊगाच गैरसमज नको”, असा खोचक टोला रामदास कमद यांनी लगावला.
“संजय राऊत यांचं नावं कदम विसरले.संजय राऊत उठल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुरू होतंय. उद्धव ठाकरे तुम्हाला बोलताना लाज वाटली पाहिजे, ज्या मोदींनी बाळासाहेबांची स्वप्न सकार केलीयत आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करताय? अडीच वर्ष माणूस मुख्यमंत्री झाला आणि ‘मातोश्री’मध्ये बसला, शरद पवार यांनीही त्यांच्या पुस्तकात याबाबत लिहलंय. अडीच वर्षात 10 मिनीट मुख्यमंत्री मंत्रालयात आला, गिनीज बुकमध्ये नोंद व्हायला पाहिजे”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
‘ह्यांना सगळं आयतं मिळालं’
“ह्यांना सगळं आयतं मिळालं. आयत्या बिळावर नागोबा बसलेत. अनेक गोष्टी अशा आहेत त्या विधानसभेवेळी मी बाहेर काढणार आहे. खोके, खोके कुणी कुठं किती खोके दिले हे सगळं मी बाहेर काढणार”, असा इशारा रामदास कदम यांनी दिला. “बाळासाहेब आणि राहुल बजाज यांच्या भेटी दरम्यान राहुल बजाज यांना भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ह्यांनी माझी शिवसेना वाचवली अशी ओळख करून दिली”, असं रामदास कदम म्हणाले. “विदेशात कुणाचे बंगले आहेत, धंदे आहेत, स्वीस बँकेत कुणाचे पैसे आहेत हे सगळं बाहेर काढणार, मी रामदास कदम आहे. मी सुद्धा पोलीस खातं चालवलं आहे”, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.