AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune missing: धक्कादायक, पुण्यातून का गायब होतायेत महिला? 7 महिन्यांत 840 महिला बेपत्ता, काय आहेत कारणं?

पिंपरी चिंचवड पोलीस कमिश्नरांच्या हद्दीतून 885 महिला बेपत्ता झाल्यात. तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या नोंदीनुसार हा आकडा 743 आहे. या महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या कारमांमुळे या महिला बेपत्ता होत असल्याची माहिती आहे. घरातील भांडणे, पटत नसणे, प्रेम प्रकरणे, अवैध संबंध, अपहरण, मानवी तस्करी अशी काही कारणे यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच स्वतंत्र जीवनशैली हेही यामागचे एक कारण असल्याचे सांगण्यात येते आहे.  

Pune missing: धक्कादायक, पुण्यातून का गायब होतायेत महिला? 7 महिन्यांत 840 महिला बेपत्ता, काय आहेत कारणं?
का बेपत्ता होतायेत महिला?Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 5:01 PM
Share

पुणे – पुणे जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून महिला बेपत्ता (women disappear)होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. गेल्या सात महिन्यांत पुणे जिल्ह्यातून (Pune district) 840 महिला गायब झाल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी 2022 सालातील गेल्या सात महिन्यांतील दिलेल्या आकडेवारीत 840  महिला बेपत्ता झाल्याची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यातल्या 396 महिलांचा आत्तापर्यंत तपास लागलेला नाही. जून महिन्यात सर्वाधिक 186 महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर मे महिन्यात 135  महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad)पोलीस कमिश्नरांच्या हद्दीतून 885 महिला बेपत्ता झाल्यात. तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या नोंदीनुसार हा आकडा 743 आहे. या महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या कारमांमुळे या महिला बेपत्ता होत असल्याची माहिती आहे. घरातील भांडणे, पटत नसणे, प्रेम प्रकरणे, अवैध संबंध, अपहरण, मानवी तस्करी अशी काही कारणे यामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच स्वतंत्र जीवनशैली हेही यामागचे एक कारण असल्याचे सांगण्यात येते आहे.

का गायब होतायेत महिला?

घरातून महिला अचानक बेपत्ता होण्याच्या प्रकरणात वाढ झाल्याने पोलिसांपुढेही चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. या बेपत्ता महिलांतील अनेक महिलांनी कौटुंबीक कलह किंवा नोकरी शोधण्यासाठी घर सोडल्याची माहिती आहे. यातल्या अनेक महिलांना नंतर त्यांची चूक उमगल्यानंतर त्या घरीही परतल्याची माहिती आहे. या सगळ्यात जास्त मुली या सरासरी 16 ते 25 च्या वयोगटातील आहे. घरात सातत्याने होत असलेल्या भांडणांमुळे त्यातील अनेकींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

मानवी तस्करीचाही संशय

गायब होणाऱ्या महिला या मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर या सगळ्या प्रकरणांची पाळेमुळे ही मानवी तस्करीशी संबंधित असू शकतात, असा सामाजिक कार्यकर्ते आणि एनजीओंना संशय आहे. या सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि एनजीओ याच विषयावर काम करीत आहेत. तर पोलिसांच्या माहितीनुसार, या महिला अनेकदा कारणांमुळे घर सोडत असल्याची माहिती आहे. या महिलांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वतंत्र जीवन जगण्याची महिलांची इच्छा

ज्या महिला आता घरी परतल्या आहेत, त्यांच्यामुसार त्या स्वतंत्र जीवन जगू इच्छित होत्या, म्हणून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. असे पोलिसांना त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. अनेक महिलांना घरातील रुढी, परंपरा मान्य नसल्याने, त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचेही सांगण्यात येते आहे. तर अनेक प्रकरणांत महिलांचे अपहरणही झाले असल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.