अखेर रिंगरोड मार्गी लागला; सोलापूरकरांना मिळालं नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट

शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेली सोलापूरकरांची डोकेदुखी अखेर कमी होणार आहे. सोलापूरकरांना नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. राज्यातील महायुती सरकारने सोलापूरकरांसाठी रिंगरोडचं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नव्या रिंगरोडचा कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी उपयोग होणार आहे.

अखेर रिंगरोड मार्गी लागला; सोलापूरकरांना मिळालं नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट
Solapur Ring RoadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 5:35 PM

सोलापूर | 6 जानेवारी 2024 : सोलापूरकराच्या आनंदात भर घालणारी बातमी आहे. सोलापूरकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गिफ्ट दिली आहे. सोलापूरकरांना नव्या वर्षात 45 किलोमीटरच्या रिंग रोडचं गिफ्ट देण्यात आलं आहे. सोलापूरकरांसाठी रिंग रोड खुला करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आर्थिक बचतही होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोलापूरकरांना नव्या वर्षात 45 किलोमीटरचा रिंग रोडचं गिफ्ट देण्यात आलं आहे. नव्या रिंगरोडचा कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी उपयोग होणार आहे. सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर या रिंग रोडचं काम सुरू करण्यात आलं होतं.

गावं, शहरं जोडली जाणार

लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम 2022 पासून सुरू होते ते आता पूर्ण झाले आहे. रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा 45 किलोमीटरच्या रिंग रोडची निर्मिती करण्यात आली आहे. या रिंगरोडमुळे अनेक फायदे होणार आहेत. एकूण पाच शहरांना हा रिंगरोड जोडला गेला आहे. जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डीसह अनेक गावेही या रोडमुळे जोडल्या गेले आहेत.

विकासात मोठी भर

ओझोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या रिंगरोडचं काम देण्यात आलं होतं. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं आहे. त्यामुळे या परिसरातील विकासात मोठी भर पडणार आहे. पाच शहरांशी हा रोड जोडला गेल्याने सोलापूरचा आर्थिक चेहरामोहरा बदलून जाणार आहे. विकासाचे अनेक प्रकल्प शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दळणवळणाच्या नव्या साधनामुळे विकास प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यताही बळावली आहे.

कनेक्टिव्हीटी वाढणार

रिंगरोडमुळे सोलापूरच्या लगत असलेले पाच विभाग सोलापूर शहराशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. या प्रकल्पात 2-लेन/4-लेन महामार्ग बांधण्याचा अंतर्भाव आहे. पूल आणि कल्व्हर्टचे रुंदीकरण तसेच पुनर्वसन, फूटपाथ बांधणे आदी गोष्टी या प्रकल्पातून पूर्ण होणार आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमय प्रताप सिंग म्हणाले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.