खिशात पैसे नाही, तरी करा एसटीने प्रवास, कसे होणार शक्य

Pune News st mahamandal | राज्य परिवहन महामंडळ आता डिजिटल होऊ लागले आहे. यामुळे खिशात पैसे नसतानाही एसटीचा प्रवास करता येणार आहे. परिवहन महामंडळाने ही सुविधा सुरु केली आहे. पुणे विभागात चौदा आगारात डिजिटल सुविधा सुरु झाली आहे.

खिशात पैसे नाही, तरी करा एसटीने प्रवास, कसे होणार शक्य
ST BUSImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 8:21 AM

योगेश बोरसे, पुणे | 12 डिसेंबर 2023 : महाराष्ट्रात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रत्येक शहरच नाही तर गावही जोडले गेले आहे. गाव तेथे एसटी अशी घोषणाच महामंडळाने केली होती. ग्रामीण भागात एसटीचा मोठा आधार प्रवाशांना आहे. आता परिवहन महामंडळ काळाप्रमाणे बदलत आहे. नवीन नवीन सुविधा एसटीत दिल्या जात आहे. एसटी महामंडळाने मोठ्या शहरामध्ये स्लीपर कोच बसेस सुरु केल्या आहेत. नवीन बसेसची खरेदी होत आहे. आता महामंडळ डिजिटल सुद्धा झाले आहे. म्हणजेच तुमच्या खिशात पैसे नसताना एसटीने प्रवास करत येणार आहे. एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.

काय आहे नेमकी सुविधा

ऑनलाईनचा जमाना आला आहे. खिशात पैसे नसताना खरेदी करता येते. खिशात पैसे नसताना रेल्वे प्रवास किंवा खासगी बसने प्रवास करत येतो. आता एसटी महामंडळानेही ही सुविधा दिली आहे. एसटी बसमध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट काढून बस प्रवास करता येणार आहे. पुणे विभागात ही सुविधा सुरु झाली आहे. पुणे शहरात यापूर्वीच पीएमपीएमएलने ही सुविधा सुरु केली होती. पुणे विभागात १८ ते २० हजार पेमेंट ऑनलाईनच्या माध्यमातून जमा होऊ लागल्याची माहिती शिवाजीनगर विभागाचे आगार प्रमुख ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

कार्ड स्वॅप करुन तिकीट काढा

अनेक जण आता खिशात पैसे ठेवत नाही. परंतु डिजिटल पेमेंटचे पर्याय ठेवतात. बँकेचे कार्ड किंवा मोबाईलने पेमेंट करतात. त्यामुळे एसटी महामंडळानेही तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता कार्ड स्वॅप करुन तिकीट देण्याची पद्धत लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात सुट्या पैशांवरुन होणार वादही टळणार आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.