AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St Strike | गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी महामंडळात कामबंदचा इशारा फोल, आता…

पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा दीर्घ संप वर्षापूर्वी झाला होता. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली. परंतु त्यांच्या या हाकेला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यातील सर्वच विभागात एसटीची सेवा सुरळीत सुरु आहे. यामुळे सदावर्ते यांनी पुकारलेला संप फसला […]

St Strike | गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी महामंडळात कामबंदचा इशारा फोल, आता...
ST BUSImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 06, 2023 | 10:37 AM
Share

पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा दीर्घ संप वर्षापूर्वी झाला होता. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली. परंतु त्यांच्या या हाकेला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यातील सर्वच विभागात एसटीची सेवा सुरळीत सुरु आहे. यामुळे सदावर्ते यांनी पुकारलेला संप फसला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी शासनाकडून या संपाच्या हाकेनंतर पावले उचलली गेली आहे. राज्य शासनाने आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून अनेक मागण्यांसाठी एसटी महामंडळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतरही कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यात सर्वत्र एसटीची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धत रद्द करणे, दिवाळी बोनस आणि वाढीव महागाई भत्ता देणे हे प्रमुख मुद्यांसाठी काम बंद पुकारले होते.

राज्य सरकारकडून चर्चेची तयारी

एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने पावले उचलली आहे. सरकारने गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका बसू नये यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघटनेकडून देखील आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • सातव्या वेतन आयोगानुसार एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना पगार वाढ मिळाली आहे, परंतु चालक, वाहक, मेकॅनिक यांना पगारवाढ दिली गेली नाही. त्यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळावी.
  • महाविकास आघाडी सरकार असताना एसटीच्या विलीनीकरण संदर्भात समिती नेमली होती. ती समिती रद्द करून नव्याने समिती गठीत करावी
  • राज्य सरकारने ४२% महागाई भत्ता दिला आहे. मात्र २०१६ पासून थकीत देयक दिलेली नाही. ती त्वरित मिळावी.
  • मोटर व्हेइकल ऍक्ट नुसार एसटी मधील ८५% गाड्या रद्दबादल आहेत. त्यामुळे नवीन इलेक्ट्रिकल गाड्या आणाव्यात आणि त्यावरती एसटी महामंडळाचे चालक, वाहकांची नेमणूक करावी.
  • एसटी महामंडळाच्या प्रत्येक गाडीचे इन्शुरन्स काढावे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.