चर्चा अनेकदा झाली पण आता शाळेतच देणार विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे

abdul sattar announcement : विद्यार्थ्यांना आता शाळेत कृषी शिक्षणाचे धडे मिळणार आहे. यामुळे बालपणीच पारंपारीक शेती आणि आधुनिक शेती असा संगम घातला जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा ओढा कृषीकडे निर्माण होणार आहे.

चर्चा अनेकदा झाली पण आता शाळेतच देणार विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे
agri education in school
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 4:52 PM

प्रदीप कापसे, पुणे : भारत शेती प्रधान देश म्हटला जातो. अजूनही अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. परंतु देशातील पांरपारीक शेतीला आधुनिकतेची जोड दिली गेली नाही. यामुळे शेती नफ्याची राहिली नाही. परंतु आता विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लहानपणीच शेतीचे ज्ञान मुलांना देण्यात येणार आहे. यामुळे चांगला इंजिनिअर, डॉक्टरसारखा चांगला शेतकरी देशात व राज्यात तयार होणार आहे. यासंदर्भातील महत्वाची घोषणा कृषीमंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी पुणे येथे केली. शाळेत कृषी शिक्षण देण्यात येणार आहे.

काय केली घोषणा

राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून कृषी शिक्षण विषय लागू करण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण विषय समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुलांनी चांगला अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअरसारखा उत्तम शेतकरी व्हावा, हा या मागील हेतू आहे. यापूर्वी अनेकदा शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

रिफायनरीवर निर्णयानुसार काम

रिफायनरीचा शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार काम सुरु आहे. जर त्या ठिकाणच्या काही लोकांचा विरोध असेल तर त्याचही म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांना आहे. तेच या विषयाबाबत निर्णय घेतील, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सुटीवर नाही

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री सुट्टीवर गेले असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री त्यांच्या गावी गेले आहेत. त्यांनी सुट्टी घेतलेली नाही. २४ तासांतील १८ तास ते काम करत आहेत. मातोश्री दरवाजा खुले असणे एकट्याच प्रश्न नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेलेल्या ४० जणांचा विषय आहे. आम्ही सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.

हा फक्त तुमचा खेळ

भाजप आणि अजित पवार यांच्यामधील चर्चांवर अब्दुल सत्तार म्हणाले की, भाजप आणि अजित पवार यांच्यामधील आँख मिचोली फक्त तुमच्या कॅमेऱ्यासमोर सुरू आहे. त्याचा आमच्या सरकारशी काहीही संबंध नाही. आमचं सरकार स्थिर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.