Pune Flight canceled | लोहगाव विमानतळावरील विमानाचे उड्डाण अचानक रद्द; प्रवाश्यांचे हाल
याबाबत या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान रद्द केल्यानं प्रवाशी संतापले. गो एअरच्या अधिकाऱ्यांना संतप्त प्रवाशांनी घेराव घातला.
पुणे – मागील दोन- तीन दिवसांपूर्वी लोहगाव विमानतळावर सुखोई विमानाचा (Sukhoi aircraft)टायर फुटल्याची घटना घडली होती. त्यावेळी मोठ्याप्रमाणात हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज गो एअरचं दिल्लीला जाणारं विमान अचानक रद्द झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी 10:50 ला लोहगाव विमानतळावरुन दिल्लीला जाणार हे विमान अचानक रद्द करण्यात आले. याबाबत या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (passengers)कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान रद्द केल्यानं प्रवाशी संतापले. गो एअरच्या अधिकाऱ्यांना संतप्त प्रवाशांनी घेराव घातला. यावेळी माहिती देण्यावरून पुणे विमानतळावर अधिकारी-प्रवाशांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. ऐनवेळी विमान रद्द (Flight canceled)केल्यानं प्रवाश्याना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.
प्रवाश्यांना मनस्ताप लोहगाव या विमानतळावरून दिवसाला साधारण 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते. सुखोई विमानाचे टायर फुटल्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तात्काळ विमानसेवा बंद केली. यामुळे अनेक प्रवाशी विमानतळावरच अडकून पडले. तसेच विमातळावर मोठ्याप्रमाणात प्रवाश्यांची गर्दी निर्माण झाली होतीत्यावेळच्या पुर्ण शेड्युलवर परिणाम होणार झाला आहे. याचा फटका विमानतळ प्रशासना सोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसला होता. त्यावेळीही यासगळ्याचा प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. काही तासानंतर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.