Supriya Sule : दिवाळीत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार का?; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या बारामतीत आल्या आहेत. बारामतीत आल्यावर त्यांनी विविध मुद्द्यांवरून मीडियाशी संवाद साधला. ड्रग्स प्रकरणापासून ते दिवाळीत पवार कुटुंब एकत्र येणार का? या विषयापर्यंत त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

Supriya Sule : दिवाळीत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार का?; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
supriya sule Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 12:12 PM

नाविद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 20 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यानंतर खरी राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावाही या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. अजितदादा पवार यांनीच बंड केल्याने पवार कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. अजितदादांच्या या बंडामुळे पवार कुटुंबीयांवर काही परिणाम होणार का? असा सवाल केला जात आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडूनही अजितदादांच्या या निर्णयाचा कुटुंबावर काहीच परिणाम होणार नसल्याचं वारंवार सांगितलं गेलं आहे. मात्र, आता दिवाळी तोंडावर आल्याने पवार कुटुंब दिवाळीत एकत्र येणार का? असा सवाल केला जात आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीत शहरातील माळावरच्या देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शारदाबाई पवार आणि प्रतिभा पवार या नवरात्र उत्सव करतात. माझ्या आईची आणि आजीची आस्था असल्यामुळे मी दर्शनाला आले आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गोविंद बाग हे माझं किंवा शरद पवार यांचं घर नसून महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेच घर आहे. 365 दिवस हे घर महाराष्ट्रातील जनतेसाठी कायम उघडं असतं. त्यामुळे तुम्ही कधीही गोविंद बागेत येऊ शकता. या घरावर जेवढा माझा हक्क आहे, तेवढाच तुमचा हक्क गोविंद बागेवर आहे. आम्ही नेते म्हणून सर्व गोष्टी करत नाही. काहीवेळा कौटुंबिक नाती असतात. पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील. राजकीय मतभेद जरूर झालेले आहेत. राजकीय मतभेद वेगळे असतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कोणत्याच कुटुंबाने डावलू नये

कुटुंबातील नाती आणि जबाबदाऱ्या पवार कुटुंबीयांनी नव्हे तर कोणत्याच कुटुंबांनी डावलू नये या मताची मी आहे. कारण मी भारतीय संस्कृती मानणारी आहे. जेव्हा राजकीय लढाई असेल तर ती पूर्ण ताकदीने लढली जाईल. जेव्हा कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या असतील तर जबाबदारीने पार पाडू, असंही त्यांनी सांगितलं.

ही लोकशाही आहे

मनोज जरांगे यांची आज बारामतीत सभा होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज जरांगे यांची बारामतीत सभा होत आहे, त्यांचं स्वागत आहे. ही लोकशाही आहे. कोणी कुठेही सभा घेऊ शकतो. आमच्यासाठी तर ही लोकशाही आहे. दिल्लीच्या सत्तेतील दडपशाही लोकांना वागणुकीतून दिसत आहे. आम्ही लोकशाहीच्या बाजूचे लोक आहोत. महाराष्ट्रात आणि भारतात आम्ही लोकशाहीवादी लोक आहोत. जरांगे यांनी कुठे सभा घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही त्या म्हणाल्या.

तर अंधारे यांच्या मागे उभं राहू

सुषमा अंधारे या ड्रग्ज विरोधात लढा देत आहेत आणि सत्तेत असलेली ही लोक त्याला सीरियस न घेता त्या महिलेला दमदाटीची भाषा करत आहे. ही गोष्ट महाराष्ट्राला न शोभणारी आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. हा पक्षाचा विषय नाही. हा महिलेचा आणि ड्रग्सचा विषय आहे. कोणीही ड्रग्सला सपोर्ट करत असेल, सत्याचा बाजूने उभे राहत असेल, त्याच्यावर हे ट्रिपल इंजिन सरकार दडपशाही करत असेल तर अंधारे यांच्या पाठिशी ताकतीने उभे राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.