TET Exam Scam | सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे.

TET Exam Scam | सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 4:05 PM

पुणे: टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी (TET Exam Scam) कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर (sushil khodwekar) यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने खोडवेकर यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर (pune cyber police) पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे. हा घोटाळा कसा झाला? याची माहिती खोडवेकर यांच्याकडून पोलीस काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या घोटाळ्यातील खोडवेकर यांच्या सहभागाबाबतची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी आज दुपारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली आहे. सुशील खोडवेकर हे 2009च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळ्याची पाळंमुळं खोदून काढण्यास सुरुवात केली असून खोडवेकर यांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना आज दुपारीच पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

घोटाळा कसा होत होता?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेपरीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे . घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक सत्र सुरूच राहणार

टीईटीमध्ये 7800 अपात्र उमेदवार पात्र ठरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे आणखी लोकांना यामध्ये अटक होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत 40 आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामधील काहीआरोपी यातील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कर्मचारी कामावर नव्हेत. त्यामुळे तपासही थंडावला होता. मात्र पुन्हा तपासाची चक्रे वेगवान झाली आहेत.

संबंधित बातम्या:

TET exam scam | टीईटी परीक्षा घोटाळाची धक्कादायक आकडेवारी उघड …

TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ …

अर्थसंकल्पाआधीच परकीय गंगाजळीने सरकारची चिंता वाढवली, रुपयाला मजबूत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.