हेमंत रासने प्रचंड बहुमताने विजयी, कसब्यात फ्लेक्सबाजी; सुषमा अंधारे म्हणतात, निवडणूक आयोगाने कानात…

उद्या 2 मार्च रोजी कसबा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. कसब्यासह चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

हेमंत रासने प्रचंड बहुमताने विजयी, कसब्यात फ्लेक्सबाजी; सुषमा अंधारे म्हणतात, निवडणूक आयोगाने कानात...
sushma andhareImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:10 AM

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अजून एक दिवस बाकी आहे. उद्या कसबा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. मात्र, त्या आधीच भाजपला घाई झालेली दिसते. कसब्यात थेट भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल हेमंत रासने यांचं अभिनंदन असं फ्लेक्सवर लिहिलं आहे. त्यामुळे कसब्यात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. निकाला आधाची भाजपने फ्लेक्सबाजी कशी सुरू केली? भाजपला कसब्याचा निकाल आधीच माहीत आहे काय? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत. तर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या फ्लेक्सवरून भाजपला धारेवर धरलं आहे.

काय आहे फ्लेक्सवर?

कसब्यात भला मोठा फ्लेक्स लागला आहे. त्यावर हेमंत रासने यांचा विजयी मुद्रेतील फोटो लावण्यात आला आहे. त्यावर यतो धर्म: ततो जय: असं लिहिलंय. त्यानंतर आमदार हेमंत (भाऊ) रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन, अशा शुभेच्छा देणारा मजकूर फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. श्रीराम भक्त प्रथमेश सतिश पाठक यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. ते भाजपच्या पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. या बॅनर्सवर पाठक यांचाही फोटो आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी हा फ्लेक्स लावण्यात आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारे यांचा टोला काय?

या फ्लेक्सबाजीवर सुषमा अंधारे यांनी टोलेबाजी केली आहे. निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितलं की काय? सकाळी सकाळी रासने जिंकण्याची ही फ्लेक्सबाजी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आणणारी नाही का…? या फ्लेक्सबाजीचा अर्थ काय काढायचा, हे तथाकथित महाशक्तीच्या मनसबदाऱ्यांनी कृपया आम्हाला समजावून सांगावे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

उद्या निक्काल

उद्या 2 मार्च रोजी कसबा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. कसब्यासह चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकाचा निकाल लागणार आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर उभे आहेत. तर, हिंदू महासंघाचे नेते आनंद दवेही कसब्यातून निवडणूक लढत आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.