टीईटी घोटाळा, तुकाराम सुपे अन् राज्यातील बड्या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची माया

Pune News | तुकाराम सुपे यांनी तीन कोटी ५९ लाख ९९ हजार रुपयांच्या संपत्तीप्रकरणी कोणताही खुलासा करु शकले नाही. तुकाराम सुपे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. आता राज्यातील आठ बडे अधिकारी चौकशीच्या रडारवर आले आहे.

टीईटी घोटाळा, तुकाराम सुपे अन् राज्यातील बड्या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची माया
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 9:41 AM

अभिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. आता अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम सुपे यांनी तीन कोटी ५९ लाख ९९ हजार रुपयांच्या संपत्तीप्रकरणी कोणताही खुलासा करु शकले नाही. त्यांनी हे पैसे भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा आरोप आहे. हे पैसे १९८६ पासून ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान कमावले आहे. त्यांच्याकडे ही रक्कम आली कुठून याची चौकशी सुरु आहे. आता राज्यातील आठ बडे अधिकारी चौकशीच्या रडारवर आले आहे.

अशी मिळाली रक्कम

तुकाराम सुपे यांच्याकडे एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया सापडली. त्यांच्या घरातून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार रोख रक्कम मिळाली होती. तसेच १४५ तोळे सोन्याचे दागिने मिळाले होते. शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन त्यांचा पास केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे तुकाराम सुपे यांच्यासह राज्यभरातील 3 बड्या शिक्षण अधिकाऱ्यांवर अपसंपदा मालमत्ता प्रकरणी पुणे लालूचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षणाधिकाऱ्याकडे ५.८५ कोटी

सोलापूर जिल्ह्य परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे उत्पनापेक्षा पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६८३ रुपयांची अपसंपदा मिळाली. तसेच सांगली येथील निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यांच्याकडे ८३ लाख ९१ हजार ९५२ रुपये मिळाले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सुपे यांच्या पत्नीच्या नावावर जमीन आहे. त्यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी सुरु आहे, असे एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

राज्यभरात करणार चौकशी

पुणे ACB कडून करण्यात राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. बुधवारी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ॲक्शन मोडवर आलेले आहे. आता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्यातील 8 बड्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची चौकशी

  1. विजयकुमार सोनवणे, अधीक्षक वेतन जिल्हा परिषद सांगली वर्ग दोन
  2. वंदना वळवी, गटशिक्षणाधिकारी,महाबळेश्वर
  3. प्रतिभा सुर्वे, गटशिक्षणाधिकारी,शाहूवाडी,कोल्हापूर
  4. विलास भागवत, गटशिक्षणाधिकारी ,पाटण, सातारा
  5. व्हीं, डी ढेपे, अधीक्षक शालेय पोषण आहार शिक्षण मंडळ पुणे
  6. शिल्पा मेनन, अधीक्षक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे
  7. आर एस वालझडे, गटशिक्षणाधिकारी हवेली पुणे
  8. प्रवीण अहिरे, विभागीय उपसंचालक
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.