पुणे ग्रामीणच्या महिला पोलीस आजपासून ‘ऑन ड्युटी 8 तास’!
महिला पोलिसांना (Women Police) तर ज्यादा तास काम करावं लागत असल्याने कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : पोलिसाची (Police) नोकरी म्हटली की त्याला वेळेचं बंधन नाही. अनेकदा बंदोबस्त, सण-उत्सव यांच्यावेळेस पोलिसांना घड्याळाकडे न पाहाता आपलं कर्तव्य बजावावं लागतं. ज्यादा तास काम करण्याचा पोलिसांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौंटुबिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यात महिला पोलिसांना (Women Police) तर ज्यादा तास काम करावं लागत असल्याने कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुणे ग्रामीण दलात कर्तव्य बजावणाऱ्या सुमारे साडेतीनशे महिला पोलिसांना लाभ होणार आहे. (The duty of women police in Pune rural force has now been reduced to eight hours)
कर्तव्यावर आणि आरोग्यावर परिणाम
पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेकवेळा ज्यादा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. यासोबतच त्यांच्या कर्तव्यावर आणि आरोग्यावरही याता परिणाम होत आहे.
आजपासून निर्णयाची अंमलबजावणी
याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला पोलिसांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करत त्यांना 12 तासांऐवजी 8 तास कर्तव्य बजावण्यास सांगावे, असा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार, ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पुरूष पोलिसांची ड्युटीही 8 तासांची करण्याचा विचार
पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या महिला पोलीस अंमलदारांना आजपासून 8 तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. या निर्णयाचं सर्व महिला पोलिसांनी स्वागत केलं आहे. प्रयोगिक तत्वावर हा महिला पोलिसांची ड्युटी कमी करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुरूष पोलिसांची ड्युटीही 8 तासांची करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.
याआधी नागपूर पोलिसांचा उपक्रम
पुण्याआधी नागपूरमध्ये अशाप्रकारचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 28 ऑगस्टला महिला पोलिसांना आठ तास ड्युटी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याचे कौतुक केलं आहे. पोलीस दलातल्या इतर घटकांनीही याबाबत विचार करण्यासंदर्भात महासंचालकांनी सूचना दिल्या आहेत.
पुण्यात ‘मोक्का’ची ‘हाफ सेंच्युरी’ पूर्ण
पुणे (Pune) शहरात फोफावत असलेल्या गुन्हेगारीला (Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचा (मोक्का) (Maharashtra Control of Organised Crime Act) दंडुका उगारला आहे. गेल्या 11 महिन्यांत पुण्यातल्या कुख्यात टोळ्यांना आवर घालण्यासाठी तब्बल 50 टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे साडेतीनशे गुडांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. गुंडांच्या टोळ्यांबरोबरच, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, फसवणूक, दरोडा टाकणाऱ्या गुंडांचा या कारवाईत समावेश आहे. सोमवारी पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या बल्लुसिंग टाक टोळीवर 50 वी मोक्का कारवाई केली आहे.
इतर बातम्या :