AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत ‘स्वयंपाक करण्यास का उशीर झाला’ असे विचारत पतीने पत्नीला पेटवले ; वाचा पूर्ण घटना

घटनेच्या दिवशी राहुल घरी आला तेव्हा त्यांने पत्नीला स्वयंपाक झाला आहे का असे विचारले. त्यानंतर स्वयंपाक झाला नाही मी लगेच करते असे उत्तर पत्नीने दिले. मात्र तुला स्वयंपाक करण्यास उशीर का झाला असे विचारत आरोपी राहुल पारधेने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने रागाने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले.

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत 'स्वयंपाक करण्यास का उशीर झाला' असे विचारत पतीने पत्नीला पेटवले ; वाचा पूर्ण घटना
Rahul pardhe
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 5:05 PM
Share

पिंपरी – शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी मधील नेहरूनगर(pimpri neharunagar ) भागात पत्नीकडून स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून पतीने डिझेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती बाळू उर्फ राहुल पारधे याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत आरोपी पतीला अटक केली आहे. राहुल पारधे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातखळबळ निर्माण झाली आहे. जखमी पत्नीचा जाबबी घेऊन पतीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने(court)  चार दिवसांची पोलीस कोठडी(police custody)  सुनावली आहे.

तर झाले असे की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल पारधे पिंपरीत आपल्या पत्नीसह वास्तव्यास आहे. आरोपी आपलया पत्नीवर सतत संशय घ्यायचा. घटनेच्या दिवशी राहुल घरी आला तेव्हा त्यांने पत्नीला स्वयंपाक झाला आहे का असे विचारले. त्यानंतर स्वयंपाक झाला नाही मी लगेच करते असे उत्तर पत्नीने दिले. मात्र तुला स्वयंपाक करण्यास उशीर का झाला असे विचारत आरोपी राहुल पारधेने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने रागाने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. या पेटलेल्या पत्नीचे जीव वाचवण्यासाठी साठी आरडाओरडा केला . त्यानंतर शेजारच्या व्यक्तीनी येऊन पत्नीला वाचवले व तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेत पीडित पत्नी 35 ते 40 टक्के भाजली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पत्नीची भेट घेतली . घटनास्थळावर भेट दिली.

बीडमध्ये पुन्हा एकदा पुतण्याचा विजयी गुलाल, काकाची धुळधाण, राजूरी सेवा सोसायटीवर राष्ट्रवादीची मोहोर!

Sindhudurg |Kudalमध्ये भरवस्तीत आढळला गवा; परिसरात भीतीचे वातावरण

Video | गोवा प्रदेश काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या नातीनं ओपेरा गायला! प्रियंका गांधीच्या अंगावर काटा उभा राहिला

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.