आता धावणार इलेक्ट्रिक एसटी, पुण्यातून या पाच शहरांचा प्रवास होणार सुखकर
राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची (Electric Vehicle Policy) अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. याचंच एक पुढचं पाऊल म्हणून राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीही (ST) लवकरच इलेक्ट्रिक बस (Electric Bus) वापरणार आहे.
पुणे : राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची (Electric Vehicle Policy) अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. याचंच एक पुढचं पाऊल म्हणून राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीही (ST) लवकरच इलेक्ट्रिक बस (Electric Bus) वापरणार आहे. पुढच्या काळात एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दिसणार आहेत. एसटी प्रशासन 100 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लवकरच यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे. (The State Transport Corporation will use electric buses from Pune to five cities in the state)
राज्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन
एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग करून देण्याची जबाबदारी महामंडळाची असणार आहे. त्यासाठी राज्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. यामध्ये पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर या शहरांचा समावेश आहे.
पुण्यात तब्बल 3 हजार किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन
पुण्यात तब्बल 3 हजार किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा अंदाजे खर्च सुमारे 2 कोटी रुपयांच्या घरात आहे. सेव्हन लव्ह चौक इथल्या विभाग नियंत्रक कार्यालयाजवळ हे स्टेशन उभारलं जाईल. पुण्यात चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या तांत्रिक परवानग्या मिळाल्या आहेत. निधीची उपलब्धता झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हे स्टेशन उभारून वापरात आणलं जाणार आहे.
एकदा चार्ज झाल्यानंतर 300 किमी धावणार बस
पुण्यात तीन हजार किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये 20 चार्जिंग पॉईंट्स असतील. यात 150 किलोवॉटसाठी 10 चार्जर तर 90 किलोवॉटसाठी 10 चार्जरचा वापर केला जाईल. एक बस चार्ज होण्यासाठी 2 तासांचा वेळ लागेल कर एकदा चार्ज झाल्यानंतर बस साधारण 300 किमी धावेल.
पुण्याहून या शहरांसाठी धावणार इलेक्ट्रिक एसटी
पहिल्या टप्प्यात एसटी महामंडळ 100 बस भाडेतत्वार घेऊन इलेक्ट्रिक बसेसचा प्रयोग करणार आहे. त्यामधल्या 30 बसेस पुणे विभागाच्या वाट्याला येणार आहेत. या बसेसची आसनक्षमता 43 असणार आहे. पुढच्या सहा महिन्यात पुणे स्थानकावरून राज्यातल्या पाच शहरांसाठी इलेक्ट्रिक एसटी धावणार आहेत. यामध्ये पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-महाबळेश्वर या शहरांसाठी पुण्याहून इलेक्ट्रिक बसेस धावतील.
चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यांना करात सवलत
वाहन घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलवरच्या वाहनांची संख्या वाढत आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबत राज्य सरकारने ई-वाहनांसाठी धोरण (E Vehicle Policy) जाहीर केलं आहे. त्यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. तर शहरं आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन (Charging Station) उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या दृष्टीने चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यांना करात सवलत दिली जाणार आहे.
इतर बातम्या :