टायगर श्रॉफ पुणेकर, घेतले कोट्यवधींची घर, महिन्याला भाड्याचे येणार लाखो रुपये
Pune tiger shroff: टायगर श्रॉफ याने पुणे शहरात घर घेतले आहे. यामुळे टायगर श्रॉफ याला आता पुणेकर म्हणता येणार आहे. टायगरने हे घर भाड्याने दिले आहे. या घराचे भाडे महिन्याला 3.5 लाख रुपये आहे. या घरासाठी 14 लाख रुपये डिपॉजिट घेतले आहे. यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे.
पुणे | 20 मार्च 2024 : बॉलीवूड कलाकार टायगर श्रॉफ आता पुणेकर होणार आहे. टायगर श्राफने पुणे शहरात घर घेतले आहे. त्याने पुणे शहरातील हडपसर भागात 7.5 कोटी रुपयांमध्ये 4,248 वर्गफूट घर घेतले आहे. पंचशील रिअल्टीने विकसित केलेल्या प्रकल्पात टायगर श्रॉफ याने जागा घेतली आहे. रियल एस्टेट डेटाबेस प्लेटफॉर्म जैपकी (Zapkey) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या मालमत्तेसाठी टायगर श्रॉफ याने 52.5 लाख रुपयांची स्टँप ड्यूटी भरली आहे. 5 मार्च 2024 रोजी हे घर टायगर श्रॉफ याने घेतले. पुणे शहरातील चांगले वातावरणामुळे अनेकांनी गुंतणुकीसाठी पुण्याला प्राधान्य दिले आहे.
घर घेताच उत्पन्न सुरु
टायगर श्रॉफ याने घर घेताच ते भाड्याने दिले आहे. या घराचे भाडे महिन्याला 3.5 लाख रुपये आहे. या घरासाठी 14 लाख रुपये डिपॉजिट घेतले आहे. यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. दरवर्षी भाड्यात पाच टक्के वाढ होणार आहे. चेराइज इंडिया प्राइव्हेट लिमिटेडने ही प्रापर्टी भाड्याने घेतली आहे. ही कंपनी शीतपेयाच्या व्यवसायात आहे.
मुंबईत आठ 8-बीएचके अपार्टमेंट
टायगर श्रॉफ याचे मुंबईतील खारमध्ये 8-बीएचके अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे. 2003 मध्ये टायगर श्रॉफचे आई-वडील जॅकी श्रॉफ आणि आयशा श्रॉफ यांना ‘बूम’ चित्रपटाच्या अपयशानंतर घर विकावे लागले होते. या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफ याने केली होती.
View this post on Instagram
यावर्षी असे झाले कलाकरांचे व्यवहार
वर्षाच्या सुरुवातीला, मृणाल ठाकूर हिने आपल्या वडिलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात अपार्टमेंट घेतले. तिने कंगना राणौतच्या कुटुंबाकडून 10 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंट खरेदी केले होते. गेल्या वर्षी, बोनी कपूरच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांनीही मुंबईच्या अंधेरी वेस्टमध्ये 12 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. गेल्या वर्षी रणवीर सिंगने मुंबईतील एका लक्झरी टॉवरमधील फ्लॅट 15.24 कोटी रुपयांना विकला होता.