पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पोलीस भरती लेखी परीक्षा १९ नोव्हेंबरला, १९ हजार ०३१९ उमेदवार देणार परीक्षा
या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातील युवकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी पात्र ठरलेले १९ हजार ०३१९ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे.
पिंपरी- पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे लेखी परीक्षेचे आयोजन केलं आहे. १९ नोव्हेंबरला ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यात मिळून ४४४ परीक्षा केंद्र आहेत. या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातील युवकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी पात्र ठरलेले १९ हजार ०३१९ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे.
याआधी ही नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलली होती. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे.
”बहुतांश परीक्षा केंद्र हे शहरातच आहेत. काही केंद्र शहरालगत आहेत. परीक्षार्थींना प्रवास आदीबाबतीत सोयीचे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षार्थींनी वेळेत केंद्रावर पोहचावे.” – डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
या नियमाचे करावे लागणार पालन
- दोन तास आधीच केंद्रावर हजर रहावे लागणार.
- परीक्षा शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे.
- परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.
- हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक
भरारी पथक ही असणार कार्यरत
कोणत्याही गोंधळा शिवाय परीक्षा पार पाडण्यासाठी भरारी पथक नेमले आहेत. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस, असे चार जणांचा प्रत्येक पथकात समावेश आहे. परीक्षा सुरू असताना हे पथक तपासणी करणार आहे,
संबंधित बातम्या:
दोन वर्षानंतर भाजपने विरोधी पक्ष म्हणून कामास सुरुवात केली ही चांगली गोष्ट; जयंत पाटलांचा खोचक टोला
कौटुंबिक वादामुळे पारा चढला, शेवटी डॉक्टरने भावावरच केला गोळीबार, गुन्हा दाखल, अहमदनगर हादरलं !