Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अंघोळीसाठी गेले, परत आलेच नाही, भीमा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

दौंड शहरातील दोन मुले भीमा नदीवर अंघोळ करण्यासाठी गेली होती. ही दोन्ही मुले अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. मात्र अंघोळ करत असताना या दोन्ही मुलांना पाण्याच अंदाज आला नाही.

Video | अंघोळीसाठी गेले, परत आलेच नाही, भीमा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
BHIMA RIVER
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 11:58 PM

पुणे : दौंड शहरातील दोन अल्पवयीन मुले भीमा नदीपात्रात  वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही दोन्ही मुलं अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात गेली होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. (two minor boys drowned in bhima river of daund taluka in pune district)

मुलं अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले

मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरातील दोन मुले भीमा नदीवर अंघोळ करण्यासाठी गेली होती. ही दोन्ही मुले अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. मात्र अंघोळ करत असताना या दोन्ही मुलांना पाण्याच अंदाज आला नाही. परिणामी दोघेही पाण्यात बुडाले.

वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवी मृत्यू

या घटनेची माहिती होताच नदीशेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी पाण्यात बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले आणि दोघांचाही मृत्यू झाला. ही दोन्ही मुले एकमेकांचे नातेवाईक आहेत. या घटनेमुळे दौंड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ :

तीन तासानंतर मृतदेह सापडले

दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्यामुले भीमा नदीच्या तिरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुलं बुडाल्यामुळे दौंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम रावबली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

इतर बातम्या :

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?

‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं

कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर

(two minor boys drowned in bhima river of daund taluka in pune district)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.