Pune : पुण्यात पुन्हा होर्डिंग्ज कोसळले, चार जण जखमी, अजूनही अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज

Pune unauthorized hoardings : पुणे शहरात मंगळवारी पुन्हा काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज कोसळले. या घटनेत चार जण जखमी झाले आहे. यामुळे पुन्हा अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यात मागील महिन्यात अनधिकृत होर्डिंग्जमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता.

Pune : पुण्यात पुन्हा होर्डिंग्ज कोसळले, चार जण जखमी, अजूनही अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज
Pune Hording
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 10:03 AM

विनय जगताप, पुणे : शहरांचा चेहरा खराब करणारे अनधिकृत होर्डिंग्जने पुणे शहरात मागील महिन्यात पाच जणांचा जीव घेतला. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यावेळी अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला आहे. मग काही ठिकाणी महानगरपालिकेकडून कारवाई झाली अन् नंतर थंडावली. पाच जणांच्या मृत्यूनंतर महानगरपालिका प्रशासन जागे झाले नाही. आता मंगळवारी पुन्हा पुणे परिसरात पाच ते सहा ठिकाणी होर्डिंग्ज पडले. त्यात चार जण जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाले आहे.

पुन्हा कुठे घडली घटना

पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी संध्याकाळी पुन्हा मोठी होर्डिंग कोसळली. या होर्डिंगखाली दबून चार जण गंभीर जखमी झाले असून चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हिंजवडी परिसरातील मान भागात एक मोठी लोखंडी होर्डिंग भर रस्त्यावर कोसळली आहे. या होर्डिंग खाली दबून दोन तरुण जखमी झाले आहेत. तसेच काही तीन-चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Pune Hording

मुळशी वादळी वारा

पुण्याच्या मुळशी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने 5 ते 6 ठिकाणी होर्डिंग्ज पडल्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिट नंतरही काही होर्डींग्स कोसळत असल्याने नागरिकांच्या मनात होर्डिंग्जची भीती निर्माण झालीय. त्यामुळे होर्डिंग्ज मानवी जीवनास धोकादायक ठरत आहे.

भोरमध्ये वादळी पाऊस

पुण्याच्या भोरमध्ये संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शासन आपल्या दारी या अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या शिबिरासाठी उभारलेला मंडप कोसळला. संध्याकाळी शिबीर आटोपल्यानंतर ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. मंडपाच मात्र यात मोठं नुकसान झालय.

किती आहेत अनधिकृत होर्डिंग्जवर

पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार आहे. पुणे महापालिका शहरात 1500 अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत. हे काढून टाकण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील किवळेतील होर्डिंग्ज कोसळल्यानं पाच जणांचा झाला होता मृत्यू झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्ट्रक्चरल ऑडीटची झाला होता निर्णय

पुणे महापालिका शहरातील अधिकृत होर्डिंग्जचं करणार स्ट्रक्चरल ऑडीट करणार होते. ऑडीटमध्ये त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येणार होती. परंतु ही कारवाई किती झाली? हा प्रश्न आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.