राज्यात अजूनही पावसाचा यलो अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain | राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढेही कायम राहणार आहे. आगामी तीन दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेले अवकाळीचे संकट अजून टळले नाही. राज्य शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात अजूनही पावसाचा यलो अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागात गारपीटमुळे काश्मीरसारखे चित्र दिसत होते. तुफान गारपीटमुळे शेतात गारांचा खच पडलेला दिसत होता.
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 9:52 AM

अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. पावसाचा हा धोका अजून पुढील तीन दिवस असणार आहे. राज्यातील अनेक भागात आज देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज दिवसभर विजांसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, नगर, पुणे , छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

अजून तीन दिवस राहणार पावसाची स्थिती

मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस राहणार आहे. हवामान खात्याने मराठवाड्याला यलो अलर्ट दिला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली 40 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत जायकवाडीत संभाजीनगर आणि जालन्याला तीन महिने पुरेल इतके पाणी पोहोचले आहे. जायकवाडीत पाणी 26 हजार क्यूसेकने पाणी येत आहे. अवकाळी पावसामुळे देखील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत होतेय वाढ. जळगावात २२ वर्षांत प्रथमच गारठा निर्माण झाला आहे. नोव्हेंबरात दिवसाचे तापमान २२ अंशावर आले आहे. भारतातील मान्सूनचा पॅटर्न बदलला असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

अवकाळीचा फटका धान पिकाला

अवकाळी पावसामुळे नागपुरात धान पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. त्यासोबतंच रब्बीतील हरभरा आणि तूर पिकालाही फटका बसलाय. राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे राज्यभरात साधारण १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेय. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साधारण १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेय. बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या आपत्तीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, १६१ जनावरे दगावली आहेत. अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांना फटका बसला असून, विदर्भातील धान पिकाचं मोठं नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

का पडत आहे पाऊस

अग्नेय राजस्थान व लगतच्या पश्चिम मध्य प्रदेश भागावर चक्रीय वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैऋत्य अरबी समुद्रावरही एक चक्रीय परिस्थिती आहे. यामुळे पश्चिम व उत्तर भागातील आद्रता वाढली असल्यामुळे राज्यात अजून दोन ते तीन दिवस हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

ही ही वाचा… राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पडत आहे पाऊस? शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.