पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या
भाजप आमदार महेश लांडगे, मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलास आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. धमकी देण्याचे कारण पोलिसांना बुचकळ्यात टाकणारे आहे. पोलीस त्याची आधिक चौकशी करत आहे.
अभिजित पोते, पुणे : भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि पीएमसी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत त्यांच्यांकडून खंडणी मागत होता. पुणे पोलिसांच्या रडारवर तो अनेक दिवसांपासून होता. धमकी देताना तो मुलीच्या नावाचाही वापर करत होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नेमके काय होते प्रकरण
आमदार महेश लांडगे यांना परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल देखील देण्यात आली आहे. संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच इतर रक्कम ही एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगण्यात आले होते.
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले होते. त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी देत लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली होती.
पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘इलेक्शनला उभे राहू नका, अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी धमकी व्हाट्सअप कॉलकरून देण्यात आली होती.
कोण आहे आरोपी
अनेक दिवसापासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत होते. राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे पुणे पोलीसांनी वेगाने तपास सुरु केला. आरोपीला पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक केली. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहेत. त्यानेच महेश लांडगे, अविनाश बागवे आणि वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिली होती. धमकी देत इमरान खंडणी मागत होता. एकतर्फी प्रेमातून मुलीच्या नावाने तो धमकी देत होता. केवळ प्रियसीला त्रास देण्यासाठी इम्रान हे सगळे प्रकार करत होता. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समजणार आहे.
अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज वसंत मोरे यांच्या मुलास आला होता. हिच मुलगी त्याची प्रियेसी असल्याची शक्यता आहे.
हे वाचा