Pune Viral Video : पुणे रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल, काय केले या पोलीसाने
Pune Viral Video : पुणे रेल्वे स्थानकावरील एक व्हिडिओची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. हा व्हिडिओ एका पोलीस कर्मचाऱ्याचा आहे. त्याने केलेल्या या प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यानेही यासंदर्भात ट्विट केले आहे.
पुणे : पुणे रेल्वे स्थानक नेहमी गजबजलेले असते. देशभरातून पुणे शहरात येणाऱ्या लोकांसाठी गावी जाण्यासाठी रेल्वे हे उत्तम साधन आहे. त्यामुळे २४ तास प्रवाशांची वर्दळ या स्थानकावर असते. या स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकाराचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. तसेच यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्याने या प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकार
पुणे रेल्वे स्थानकावर काही प्रवाशी झोपले आहेत. त्या झोपलेल्या प्रवाशांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या तोंडावर बॉटेलने पाणी टाकत आहे. रूपेन चौधरी नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विट केला. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, “RIP मानवता. पुणे रेल्वे स्टेशन.”
पुणे रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल#Pune pic.twitter.com/zrxC8FVt5V
— jitendra (@jitendrazavar) July 1, 2023
काय म्हणतात अधिकारी
रुपेन चौधरी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला. अनेकांनी या प्रकारसंदर्भात नाराजी व्यक्त केली. पुणे रेल्वे स्थानकाच्या डीआरएम इंदू दुबे यांनी या प्रकारसंदर्भात खेद प्रकट केला आहे. त्या कर्मचाऱ्याला प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला असल्याचे ट्विटमध्ये दुबे यांनी म्हटले आहे.
किती झाला व्हायरल
हा व्हिडिओ २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्याला ११ हजारांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहे. यावर काही युजरने म्हटले आहे की, सरकारने अधिक वेटींग रुम तयार करावे. यामुळे प्रवाशांना प्लॅटफार्मवर झोपण्याची वेळ येणार नाही. एका युजरने म्हटले आहे की, आपले कर्तव्य या पद्धतीने पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यास सलाम. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, पोलीस कर्मचाऱ्यास हा प्रकार करण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे.
ही ही वाचा