ते दारु आणायला सांगायचे, ससूनच्या वॉर्ड बॉयचे डॉ. अजय तावरेवर गंभीर आरोप

पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेतल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात आज तपास पथकाने ससून रुग्णालयात येऊन चौकशी केले असता आणखी गंभीर प्रकार समोर आले आहेत.

ते दारु आणायला सांगायचे, ससूनच्या वॉर्ड बॉयचे डॉ. अजय तावरेवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 7:33 PM

ससूनचे डॉक्टर अजय तावरेच्या अडचणीत वाढ झाली आहे. ससून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी चौकशी समिती समोर अजय तावरेची तक्रार केली आहे. अजय तावरे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दारू आणायला लावत होता. वडिलांच्या नावाने मला ससूनमध्ये काम करायला लावले. माझ्यासारख्या अपंगाला तावरेने त्रास दिला. सर्व शासनाकडे मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. नाईट ड्युटीला असताना अजय चंदनवाले व अजय तावरे दारू आणायला सांगत होते. चौकशी समिती समोर वॉर्ड बॉयने अजय तावरेचा तक्रारींचा पाढाच वाचला आहे. मला न्याय द्या नाहीतर मी आत्मदहन करेल असे ससूचे वॉर्डबॉय नितीन सोनवणे यांनी म्हटले आहे.

ससून चौकशी समितीने आज ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. अहवाल तयार करून राज्य सरकारला तो सादर केला जाणार आहे. ड्रिक अँड ड्राईव्ह प्रकरणात ससूनचे दोन डॉक्टर अटकेत आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तीन जणाची समिती नेमली आहे. यामधे पल्लवी सापळे, डॉ सुधीर चौधरी आणि डॉ गजानन चव्हाण यांनी चौकशी केली.

आज दिवसभर चौकशी केल्यानंतर राज्य सरकारला हा त्याचा अहवाल पाठवला जाणार आहे. आपत्कालीन कक्षात जाऊन समिती अध्यक्ष डॉ पल्लवी सापळे आणि पथकाने पाहणी केली. पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ससूनच्या ज्या कक्षात आणलं होतं त्याची पाहणी केली गेली. मेडिकल चेकअपची प्रोसिजर फॉलो करताना त्या मुलाची नोंदणी ज्या रजिस्टर मध्ये केली होती. त्यांच्या नोंदी चौकशी पथकाने घेतल्या.

सोबतच ज्या बेडवर झोपवून त्याचे रक्ताचे नमुने घेतले. त्या बेडची,कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्हीची ही पाहणी पथकाने केली. ससून रुग्णालय चौकशी समितीने जवळपास 8 तास चौकशी केली. ससून रुग्णालयचे डिन डॉ विनायक काळे यांच्या केबिनमध्ये हे सगळे कामकाज सुरु होते. समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात गुन्हे शाखेने ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी त्यांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये घेतल्याचं देखील समोर आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.