पुणेकरांनो, पाणी जपून वापरा, दोन दिवस पाणी पुरवठा बंद

बुधवारी १५ फेब्रुवारी आणि गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी बंद असलेल्या भागात दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिराने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा,  दोन दिवस पाणी पुरवठा बंद
Water
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 12:00 PM

पुणे : पुणे शहरातील नागरिकांना दोन दिवस पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. कारण काही भागांत दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. महापालिकेकडून समान पाणी योजनेंतर्गत पाण्याचे ऑडिट करण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. या कामांमुळे बुधवारी १५ फेब्रुवारी आणि गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी बंद असलेल्या भागात दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिराने पाणीपुरवठा होणार आहे, असे मनपाने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलंय.

कुठे कधी राहणार पाणी पुरवठा बंद

बुधवारी पाणी बंद असलेला भाग

हे सुद्धा वाचा

सणस पंपिग स्टेशन – नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली क्रमांक. बी १० ते बी १४

गुरुवारी पाणी बंद असलेला भाग

– चतुश्रुंगी टाकी परिसर : बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी, एसएनडीटी टाकी परिसर – शिवाजीनगर, भोसलेनगर, घाेले रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाइन, गोखलेनगर, भांडारकर रोड आणि परिसर पद्मावती टाकी परिसर – बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशीनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर. नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र – ससाणेनगर, काळे बोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.