पुणेकरांसाठी मोठी बातमी! गुरूवारी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलकेंद्रात विद्युत आणि पंपिंगविषयक तसेच स्थापत्यविषयक तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 2 सप्टेंबर म्हणजेच गुरूवारी संपूर्ण शहराचा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पुणे : पुणे शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलकेंद्रात विद्युत आणि पंपिंगविषयक तसेच स्थापत्यविषयक तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 2 सप्टेंबर म्हणजेच गुरूवारी संपूर्ण शहराचा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारीही काही भागात पाणी उशीरा किंवा कमी दाबाने येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे. (Water supply to Pune city will be cut off on Thursday due to repair work in the water station)
गेल्या महिन्याभरात काही जलकेंद्रातली कामे करण्यात आली होती. आता पर्वती, वडगाव, एसएनडीटी, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन होळकर आणि चिखली केंद्रात तातडीने दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
पर्वती जलकेंद्राअंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्?वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नंबर 42 व 46 (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,
वडगाव जलकेंद्राअंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक इ. चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र – पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.
लष्कर जलकेंद्राअंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग
लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.
नवीन होळकर पंपिंग – विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, मुळा रोड़
भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे़.
पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातला पाणीसाठा कमी
मागच्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातला पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणामध्ये 0.74 टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरणात 3.34 टीएमसी म्हणजे 90 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. पानशेत धरणात 10.65 टीएमसी तर वरसगाव धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा झाल्याने ही धरणं शंभर टक्के भरली आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या धरणात 8.34 टीएमसी पाणी आहे. उजनी धरण 33 टीएमसी पाणीसाठ्यासह 62 टक्के भरलं आहे.
इतर बातम्या :