काईम वेब सिरीज पाहून कट रचला, मुलीचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आईनेच केला बापाचा खून

Pune Cirme News : अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. यामुळे पती-पत्नीत वाद होत होता. मग मुलीच्या आईने मुलीच्या प्रियकरासोबत मिळून मुलीच्या वडिलांचा खून केला. या खळबळजनक घटनेचा पोलिसांनी पाच ते सहा दिवसांत तपास करुन दोघांना अटक केली आहे.

काईम वेब सिरीज पाहून कट रचला, मुलीचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आईनेच केला बापाचा खून
घटस्फोट घेतल्याच्या रागातून पतीने पत्नीला संपवले
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 2:39 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात खुनाची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीने पतीचा खून केला आहे. अल्पवयीन मुलींचे दुसऱ्या एकाशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंधावरुन पती-पत्नीत वाद होते होते. मग पत्नीने क्राईम बेब सिरीज पहिल्या. त्यानंतर पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुलींच्या प्रियकराला सोबत घेतले. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना खून केल्याची कबुली दिली आहे.

काय आहे प्रकार

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील ही खुनाची घटना आहे. या घटनेतील आरोपी ॲग्नेल कसबे याचे जॉन्सन लोबो याच्या अल्पवयीन मुलीशी अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाला आरोपी सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत जॉन्सन लोबो याचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो अन् मयत जॉन्सन लोबो यांच्यांत वाद होत होते. यामुळे जॉन्सन याचा कायमचा काटा काढण्यासाठी सॅन्ड्रा हिने वेगवेळया काईम वेब सिरीज पाहिल्या. त्यानंतर जॉन्सन याला संपवण्याचा कट रचला. त्यासाठी मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे याला सोबत घेतला. त्यानंतर ३० मे रोजी रात्रीचे वेळी जॉन्सन याचा त्याच्याच घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला.

हे सुद्धा वाचा

खून करुन मृतदेह जाळला

सॅन्ड्रॉ लोबो यांनी पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. ३० मे रोजी झालेल्या या खुनाचा तपास पोलिसांनी पाच-सहा दिवसांत २३० सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास लावला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ॲग्नेल कसबे आणि सॅन्ड्रा लोबो यांना अटक केली आहे. आरोपींनी ॲग्नेल कसबे याचे आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत होते प्रेम संबंध असल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.