Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी वादात, दोन दावे खरे काय ?

सांगलीनंतर पुणे येथेही महिलाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा करण्यात आली. पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने 6 एप्रिलला स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली.

महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी वादात, दोन दावे खरे काय ?
महिलांची कुस्तीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 12:45 PM

सांगली : महाराष्ट्रात पुरुषांप्रमाणे प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) घेण्यात येणार आहे. परंतु महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने 6 एप्रिलला स्पर्धा घेण्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडूनही स्पर्धेच्या नवीन तारखा आणि नवीन शहराची घोषणा केली आहे. कुस्तीगीर परिषदेने सांगलीत 23 व 24 मार्चला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळेच प्रथमच होणारी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

राज्यात पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी यासंदर्भात घोषणा केली. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी ‘किताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धा सलग तीन दिवस चालणार असून राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 45 महिला संघ सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातील संघाकडून 10 महिला कुस्तीगीर असे एकूण 450 महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. तर प्रत्येक जिल्हा तालीम संघाचा एक व्यवस्थापक, एक मार्गदर्शक असे 10 जणांचा समावेश असणार आहे.

सांगलीनंतर पुण्याची घोषणा

हे सुद्धा वाचा

सांगलीनंतर पुणे येथेही महिलांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा घेण्याची घोषणा करण्यात आली. पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने 6 एप्रिलला स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे अधिकृत स्पर्धा कोणाची? पुणे की सांगली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रथमच होणार महिलांची स्पर्धा

महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्याच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. या संदर्भात सांगली जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन माहिती देऊन चर्चा करण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे, यावेळी सांगली जिल्हा तालीम संघ चे अध्यक्ष पै नामदेवराव मोहिते,संपतराव जाधव,विलास शिंदे,प्रतापराव शिंदे,राजाराम पवार,हणमंत जाधव,विनायक पाटील हे उपस्थित होते.

महिलांना मोठी संधी

देशाला कुस्तीत महिला मल्लांनीही अनेक पदकं मिळवून दिली आहेत. हरियाणातील गीता फोगाट आणि इतर फोगाट बहिणींवर तर दंगलसारखे सिनेमे बनले आहेत. त्यामुळे पूर्वीचा दृष्टीकोण बदलत असून कुस्ती क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मुली सध्या या क्षेत्राकडे करिअर आणि छंद या दोन्ही दृष्टीकोणातून पाहत आहेत. त्यामुळे या स्पर्धा महिला मल्लांसाठी मैलाचा दगड ठरू शकतात. कुस्ती क्षेत्रासाठी हे एक मोठं पाऊल ठरेल. परंतु त्यापूर्वी दोन शहरांमधील आयोजनाचा वाद मिटवायला हवा.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.