जागतिक जलदिनादिवशीच पाण्यासाठी भटंकती; दौंडमधील जिरेगावकर पाण्यासाठी फोडताहेत टाहो…
पिण्याचा पाण्याचा प्रश्न या परिसरात गंभीर आहे, त्यातच मार्च महिना सुरु झाला असून अजून मे महिन्यातील कडक उन्हाळा सुरु होण्याआधीच येथील लोकांची पाण्यासाठी पायपीठ सुरु झाली आहे. ज्या प्रमाणे माणसांची पाण्यासाठी पायपीठ सुरु आहे त्याच प्रकारे शेती करणाऱ्या माणसांच्या जनावरांचीही पाण्यासाठी हाल सुरु आहेत.
पुणेः आज जागतिक जलदिन (World Water Day) आहे, सर्वत्र जागतिक जलदिन वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. मात्र याउलट परिस्थिती पुणे जिल्ह्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील जिरेगावकरांची (Jiregaon) आहे. मात्र पाण्यासाठी तारांबळ सुरू आहे. विशेषतः जनाई शिरसाई उपसा सिंचन विभागाकडे पाण्याची मागणी करूनही अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करत कोणी पाणी देता का पाणी अशी विचारायची वेळ आली आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न या परिसरात गंभीर आहे, त्यातच मार्च महिना सुरु झाला असून अजून मे महिन्यातील कडक उन्हाळा सुरु होण्याआधीच येथील लोकांची पाण्यासाठी पायपीठ सुरु झाली आहे. ज्या प्रमाणे माणसांची पाण्यासाठी पायपीठ सुरु आहे त्याच प्रकारे शेती करणाऱ्या माणसांच्या जनावरांचीही पाण्यासाठी हाल सुरु आहेत. त्यामुळे जिरेगाव येथील पाणी समस्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या प्रकारे गंभीर होत चालला आहे, त्याच प्रकारे शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. परिसरात पाणी नसल्याने शेतातील पिके वाळू जाण्याच्या मार्गावर आहेत. आजही अनेक पिके शेतात असून पिकांना पाणी नसल्याने हातात आलेली पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.
पाण्यासाठ्यांनी तळ गाठला
पाण्याअबभावी शेतातील ऊस जळून गेला आहे. ज्या तलावाचा शेतकऱ्यांना आधार होता त्या तलावातील पाणीही आठत गेले आहे. त्यामुळे आता पाणी प्यायचे कोणते आणि कसे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तलावर, विहिरी आणि कुपनलिकेतील पाण्यासाठ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. घागर पाण्यासाठी कोसो मैल दूर जावे लागत आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
मार्च महिना चालू झाल्यापासून जिरेगावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. कडक उन्हाळ्यातही पाण्यासाठी येथील महिलांची वणवण थांबली नाही. त्यामुळे दौंड तालुक्यातील या ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून जिरेगावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा अशा मागणीही त्यांनीही केली आहे. त्यामुळे जिरेगावातील पाण्याचा प्रश्न मिठवण्यात आला तर येथील महिलांची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबणार आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी जिरेगावातील पाणी प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी होत आहे.
संबंधित बातम्या
Rashmi Thackeray Brother : रश्मी ठाकरेंचे भाऊ असलेले श्रीधर पाटणकर नेमके आहेत कोण? जाणून घ्या!