दोघं आयटी कंपनीत इंजिनिअर, पुण्यात लॉजमध्ये थांबले, काय घडले प्रियकराने प्रेयसीवर गोळ्या झाडल्या

Pune Crime News | पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता पुन्हा प्रेमप्रकरणातून आयटी अभियंता असणाऱ्या महिलेची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. या घटनेमुळे पुणे हादरले आहे.

दोघं आयटी कंपनीत इंजिनिअर, पुण्यात लॉजमध्ये थांबले, काय घडले प्रियकराने प्रेयसीवर गोळ्या झाडल्या
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 3:51 PM

रणजित जाधव, पुणे दि.28 जानेवारी 2024 | पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यापूर्वीच झाली होती. त्यानंतर पुन्हा पुणे शहरात खळबळजनक घटना घडली आहे. आयटी अभियंता तरुणीची हत्या झाली आहे. पुणे शहरात अनेक आयटी कंपन्या आहे. पुणे शहरातील हिंडवडी हा भाग आयटी हब म्हणून ओळखला जातो. यामुळे देशातील विविध भागातून अनेक इंजिनिअर तरुण, तरुणी या भागातील कंपन्यांमध्ये कार्यरत आहे. मग हे तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे धूसफूस झाली की उच्च शिक्षित तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेण्यास मागे पुढे पाहत नाही. पुण्यात अशाच प्रकारातून आयटी इंजिनिअर महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दोघे दोन दिवसांपासून लॉजमध्ये

आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला. लखनऊमधील असणारा ऋषभ निगम तिच्या शहरातील मुलीच्या प्रेमात पडला. दोघे आयटी कंपनीत इंजिनिअर होते. गेल्या दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये थांबले होते. मात्र रात्रीत त्यांच्यात वाद झाला? त्यानंतर ऋषभ याने तिच्या प्रेयसीवर गोळ्या झाडल्या आणि तो मुंबईकडे फरार झाला.

मुंबई पोलिसांनी केली अटक

ऋषभ निगम हा हत्या करुन फरार झाल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यांनी लागलीच तपास सुरु केला. हत्या केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना अलर्ट केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला पिस्टलसह अटक केली. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

का केली हत्या

पुणे पोलिस आता ऋषभ यांची चौकशी करणार आहे. परंतु प्रेम प्रकरणातून त्याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दोघांमध्ये त्या रात्री काय झाले? त्यातून हत्या कशी घडली? हत्या करण्यासाठी ऋषभ याने बंदूक कुठून आणले? याबाबतची माहिती तपासानंतर समोर येणार आहे. तपास हिंजवडी पोलिसांनी सुरु केला आहे.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.