Pen Accuse : पेण पोलिसांच्या ताब्यातून हाफ मर्डरचा आरोपी पसार, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणी पोकलन मालकाने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला होता. वडखळ पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सदर आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तो टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला आणि पोलिसांचे लक्ष नसल्याचा फायदा घेवून त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली.

Pen Accuse : पेण पोलिसांच्या ताब्यातून हाफ मर्डरचा आरोपी पसार, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 9:47 PM

पेण : हाफ मर्डर(Half Murder)च्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पेण पोलिसां(Pen Police)च्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे. बिरू गणेश महतो (19) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बोकारो झारखंड येथील रहिवासी आहे. तो पाबल कार्ली येथे एका पोकलन मशिनवर मदतनीस म्हणून कामाला होता. (Accused of Half Murder escapes from Penn Police custody, questioning police functioning)

पोकलन मशिन ऑपरेटरवर कोयत्याने वार करुन केले होते जखमी

पोकलन मशिन ऑपरेटर राजेंद्र चोलो यादव हा आरोपी बिरू महतो याला पोकलन मशिन ऑपरेट करताना तसेच जेवण बनविण्यावरुन काही ना काही कारण काढून त्रास देत होता. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी बिरू गणेश महतो याने राजेंद्र यादव याच्या दोन्ही हाताच्या पंजांवर, डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यास गंभीर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पळून गेला

या प्रकरणी पोकलन मालकाने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला होता. वडखळ पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सदर आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तो टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला आणि पोलिसांचे लक्ष नसल्याचा फायदा घेवून त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. या प्रकारामुळे पेण पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पेण पोलिसांनी 8 पथके बनवली आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरात एका मुलाला भाई म्हणाला नाही म्हणून टोळक्याने जबर मारहाण करत कुत्र्यासारखी बिस्कीट खायला लावणाऱ्या आरोपी रोहन वाघमारे याची वाकड पोलिसांनी आज धिंड काढली. आरोपी रोहन वाघमारे याला बोलताना पीडित तरुण भाई बोलला नाही म्हणून रोहन आणि त्याच्या साथीदाराने त्याला जमिनीवर पडलेली बिस्कीट खायला लावली आणि त्यानंतर बेदम मारहाण केली होती. वाकड पोलिसांनी आरोपी रोहन वाघमारे याच्यासह त्याच्या साथीदारांची त्याच परिसरात धिंड काढत त्यांना धडा शिकवला. (Accused of Half Murder escapes from Penn Police custody, questioning police functioning)

इतर बातम्या

रुद्र बी टू वाघाची शिकार! आता आणखी 4 आरोपींना बेड्या, का करण्यात आली वाघाची हत्या?

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.