AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘3 गद्दार आणि तो खासदार याचा कडेलोट करायचाय’, भास्कर जाधव यांचा शिंदे गटावर घणाघात

उद्धव ठाकरे यांची रायगडच्या माणगाव येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

'3 गद्दार आणि तो खासदार याचा कडेलोट करायचाय', भास्कर जाधव यांचा शिंदे गटावर घणाघात
bhaskar jadhav
| Updated on: Feb 02, 2024 | 8:15 PM
Share

निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, रायगड | 2 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांची रायगडच्या माणगाव येथे सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांवर सडकून टीका केली. “आपल्या पक्षाचे 40 आमदार गद्दारी करून निघाले. 40 मध्ये आपल्या रायगडमधले 3 गद्दार आहेत. तुम्हाला सर्वांना उद्धव ठाकरेंना कौल द्यायचा आहे. ही छत्रपती यांची गादी आहे. महाराजांचं आजोळ हे विदर्भात होतं. तर जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला. महाराजांनी गादी तयार कुठं केली तर रायगडमध्ये. महाराजांनी विश्वासाने मान माझ्या कोकणातच्या खांद्यावर ठेवलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील रायगडला महत्त्व दिलंय. पण याच गद्दारांनी विश्वासघात केलाय. या तीन गद्दार आणि तो खासदार याचा कडेलोट करायचा आहे. तुम्ही कराल का कडेलोट? नाहीतर तुम्ही घेऊन चला मी स्वतः ढकलतो. एका बोटाने यांचा कडेलोट करायचा आहे. स्नेहल आणि आपले गिते साहेबांना मतदान करा आणि गद्दारांनचा कडेलोट करा”, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.

“या लोकशाहीमध्ये सर्वात मोठं पद आहे ते म्हणजे जनता, म्हणून आपल्या दरबारी उद्धव ठाकरे भेटत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 साली या राज्यात सरकार आलं. अनेक संकटांचा सामना आपण केला. कोरोना, वादळ यांचा सामना केला. संकटातून बाहेर काढण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. त्यावेळी देखील जीवघेणी शस्त्रक्रिया ही उद्धव ठाकरेंवर झाली. ते 84 तास कोणत्या अवस्थेत हे सर्वांच्या लक्षात आहे. कोणतीही हालचाल नव्हती. ज्यांच्यासोबत अनेक वर्ष घालवली त्यांनी देव पाण्यात ठेवले होते”, असं भास्कर जाधव आपल्या भाषणात म्हणाले.

‘येडा तो बोबल्या नुसता रडा रड्या नुसतं रडायचं…’

“नाशिकमध्ये बये दार उघडं असे उद्धव ठाकरे म्हटले. असंच मी आता म्हणतोय बये दार उघड आणि या गद्दारांचा कडेलोट करा. हे गद्दार गेले. पण का गेले याच अजून एक कारण धड नाही. अजित पवार निधी देत नाहीत असं म्हणतात. येडा तो बोबल्या नुसता रडा रड्या नुसतं रडायचं नाटक करायचा, बाम लाव्या”, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

“माझं जाहीर आव्हान आहे, तीनही गद्दारांना की, जलजीवनची कामे उद्धव ठाकरेंच्या काळात झाली नाहीत, असं छत्रपतींची शपथ घेऊन सांगावं. आज जी कामे आहेत ती एकनाथ शिंदे यांनी दिली असतील तर त्यांनी सांगावं उद्धव ठाकरेंच्या काळातील ही काम आहेत”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी कारकिर्दीत सर्व काम केले. तुम्ही गद्दारी कशासाठी केलीत? तर पन्नास खोक्यासाठी गद्दारी केलीत. पन्नास खोके एकदम ओके. आम्हाला पण त्रास देण्याचं काम यांनी केलंय. माणिकराव जगताप आज हयात नाहीत. पण या गद्दारांच्या विरोधात बलाढ्य विरोधात सत्तेच्या विरोधात ही मुलगी उभी आहे. तो कीलीत टोमय्या व्हिडिओ टीव्हीवर बघतलात ना? क्षा उठा बशा काढत होता”, अशी टीका भास्कर जाधवांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.