Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्या मयंकचं मोठं काम, अवघ्या 11 वर्षाच्या चिमुकल्याने रचला इतिहास, ठरला पहिला जलतरणपटू

रायगड जिल्ह्यातील उरणचा ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी ते करंजा जेट्टी हे १८ किमीचे सागरी अंतर ५ तास २९ मिनिटांत पूर्ण करून नवा विक्रम रचला आहे. यापूर्वी त्याने धरमतर ते करंजा हे अंतरही पूर्ण केले होते. हा विक्रम त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि समुद्री जलतरणातील निपुणतेचे प्रमाण आहे.

छोट्या मयंकचं मोठं काम, अवघ्या 11 वर्षाच्या चिमुकल्याने रचला इतिहास, ठरला पहिला जलतरणपटू
अवघ्या 11 वर्षाच्या मयंक म्हात्रेने रचला इतिहास, ठरला पहिला जलतरणपटू
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 6:45 PM

रायगड जिल्ह्यातील उरण, करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी 18 किमीचं अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार केलं आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. मयंकने ३ डिसेंबर २०२३ ला धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता. ज्यामुळे तो हा प्रवाह पोहून जाणारा पहिला जलतरणपटू ठरला होता. तर यावेळी घारापुरी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पोहून जाणारा मयंक पहिला जलतरणपटू ठरला आहे. त्याने या निमित्ताने नवा इतिहास रचला असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेट शाळेतील सहाव्या इयत्तामध्ये शिकणारा मयंक हा उत्कृष्ट जळतरणपटू आहे. समुद्रीय जलतरण हा त्याचा आवडता प्रकार आहे. मयंकने आजवर अनेक स्पर्धांमधून यश संपदान केले आहे. मात्र समुद्रीय जलतरण हे त्याला मोठे यश आणि प्रसिद्धी देणारे ठरले आहे.

समुद्र किनारी लागून असणाऱ्या करंजा, कोंढारीपाडा येथे राहणाऱ्या या 11 वर्षीय चिमुकल्याने आज नवा विक्रम केला आहे. मंगळवार ३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:०४ मिनिटांनी मयंकने जगविख्यात घारापुरी बंदर येथून समुद्राच्या लाटांना आव्हान देत करंजा जेट्टी गाठली आणि पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला. सागरी १८ किमी अंतर त्याने निर्धारीत वेळेपेक्षा अर्धातास आधी पोहून पूर्ण केले आहे. हा प्रवाह पोहून जाण्यासाठी ६ तासांचा अवधी अपेक्षित होता. तर मयंकने हे अंतर ५ तास २९ मिनिटात पोहून पार करत सर्वांनाच चकीत केले आहे. त्याने केलेल्या या प्रयत्नाने घारापुरी ते करंजा हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे.

मयंकच्या नावावर याआधी कोणता रेकॉर्ड?

याच प्रमाणे मागील वर्षी याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर २०२४ ला त्याने धरमतर ते करंजा हे १८ किमी अंतर पोहून पार करत तो प्रवाह पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू म्हणून आपले नाव कोरले होते. त्यामुळे रायगड, मुंबई विभागातील समुद्रीय जलप्रवाहातील दोन प्रवाहांवर मयंकने आपले नावं कायमस्वरूपी कोरले आहे.

हे सुद्धा वाचा

मयंकने केलेल्या विक्रमनंतर अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तर यावेळी मयंकचा सत्कार शेकापचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, समाजसेवक सचिन डाऊर, नितीनभाऊ कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीहोती.

मयंकने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले आई-वडील, मार्गदर्शक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील, मनोहर टेमकर, जलतरणपटू जयदीप सिंग, आर्यन मोडखरकर, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील यांचे सहकार्य त्याच्या या विक्रमादरम्यान त्याला लाभले.

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.