AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad: क्षुल्लक कारणावरुन एसटी ड्रायव्हर आणि कंटक्टरला बस थांबवून जबर मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, आरोपी ताब्यात

या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई करत या गावातून आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.

Raigad: क्षुल्लक कारणावरुन एसटी ड्रायव्हर आणि कंटक्टरला बस थांबवून जबर मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, आरोपी ताब्यात
कंडक्टर, ड्रायव्हरला मारहाणImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 7:51 PM

तळा – रोवळा-वाशी एसटी बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर (conductor and driver) हे आपली ड्युटी करत असताना बोरभाट बस स्टॉपजवळ काही नागरिकांनी त्यांना जबर मारहाण ( beaten by people)केली. बस ड्रायव्हर सचिन जंगम व कंडक्टर सुनिल शेडगे आपली तळा – वाशी गाडी घेऊन जात असताना तळे येथे 2 उन्मत्त आणि मद्यपी प्रवाशांनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र जागेअभावी चालकाने गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली व पुढे येण्याची विनंती केली. या शुल्लक गोष्टीचा राग मनात धरून दोघांपैकी एकाने दरवाज्यात उभ्या असलेल्या वाहकाला कॉलर धरून मारहाण केली व तो निघून गेला. ही बस परत येत असताना याच इसमाने आदीवासी वाडीतील जमाव एकत्र करून रस्त्यावर मोटार सायकली आडव्या घालत एसटीचा रस्ता अडवला. बोरभाटातील जमावाने गाडीत जाऊन चालक व वाहक यांना जबरी मारहाण केली. यात पुरुषांसह महीलादेखील आघाडीवर होत्या. या ग्रामस्थांनी एसटी कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवगाळ करीत जखमी केले. वाहक सुनील शेडगे यांनी याबाबत तळा पोलीस स्थानकात (Tala Police station)तक्रार केली आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

नेमके काय घडले?

याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हर सचिन जंगम व कंडक्टर सुनिल शेडगे हे तळा-वाशी गाडी घेऊन जात होते. तळा येथे दोन प्रवाशी रस्त्यात हात दाखवला असता जागेअभावी पुढे येण्याची विनंती वाहक शेडगे यांनी केली. त्यानंतर शहरातील कॉर्नरवर गाडी उभी करून त्यांनी बसमध्ये प्रवाश्यांना घेतले. त्यापैकी एक आरोपी गाडीत बसला, तर दुसरा आरोपी हा मद्यपान केलेला होता, तो खालीच होता. त्या दोघांनीही दरवाजात कंडक्टरला मारहाण केली. गाडीत बसलेल्या आरोपीने कंडक्टरला लाथ मारून तो खाली उतरून गेला. बस त्यानंतर वाशीकडे गेली, ती बस परतीच्या मार्गावर असताना या आरोपींनी आदीवासी वाडीतील काही गावकऱ्यांना फोन करून जमवले. रस्त्यावर मोटार सायकली आडव्या घालून रस्ता रोखून धरला. बस आल्यानंतर गाडीत शिरून कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी मारहाम केली. यात पुरूष आणि महीला यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना लाथाबुक्यांनी मारहाण व शिवगाळ केली. या प्रकरणात कंडक्टर सुनील शेडगे यांनी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी ताब्यात

या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई करत या गावातून आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर ड्युटीवर असताना हात उचलणे, हा मोठा अपराध मानण्यात येतो. आता या प्रकरणात या आरोपींविरोधात गुन्पोहे नोंदवण्यात आले आहेत. आता या आरोपींवर पुढे काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे.
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद.
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई.