रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवर असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 6:16 PM

रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर स्कूल बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. पाली-खोपोली रोडवरील कानसळ गावाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेनंतर मृतांना जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पाली-खोपोली महामार्गावर कालच दोपोडे येथे एसटी बस आणि सेलेरो कारचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. या अपघातात कारचं प्रचंड नुकसान झालं. तसेच एसटी बस विद्यार्थ्यांसहीत पलटी झाली होती. त्यामुळे तब्बल 48 एनसीसी विद्यार्थ्यांना मागची काच फोडून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यांना तातडीने पेण येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं होतं. या अपघातानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी देखील या महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये भीषण आपघात, दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू

दरम्यान, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कंधार-जळकोट राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघात झालाय. फॉर्च्यूनर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण आपघात झाला. या आपघातात कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील दत्तात्रेय मांनस्पुरे आणी शेख मगदुम दोन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झालाय. तर फॉर्च्यूनर कारमधील एक व्यक्ती जखमी झाला आहे.

सोलापूरच्या माढ्यात बार्शी माढा एसटीचा ब्रेक फेल, पण…

सोलापूरच्या माढ्यात बार्शी माढा एसटीचा अचानक ब्रेक फेल झाला. एसटी चालक केदारे बाबुराव नरवडे यांच्या सतकर्तमुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. एसटीतील ३० प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. एसटी मनकर्णा ओढ्याच्या पुलात कोसळली असती. मात्र चालकाने दुसऱ्या रस्त्याकडे बस वळवून मुरुमाच्या ढिगाऱ्यावर घातली आणी मोठा अनर्थ टळला. चालकाविषयी प्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.