Rain : दहीहंडी उत्सवाला पाऊस परतला, राज्यात कुठे दिला यलो अलर्ट

IMD Weather forecast : ऑगस्ट महिन्यात पाऊस नव्हता. यामुळे आता पावसाची सर्व अपेक्षा सप्टेंबर महिन्यावर आहे. परंतु सप्टेंबर महिन्याच्या पहिले दोन, तीन दिवस पावसाचा जोर नव्हता. आता कृष्म जन्माष्टमीला राज्यात पाऊस परतला आहे.

Rain : दहीहंडी उत्सवाला पाऊस परतला, राज्यात कुठे दिला यलो अलर्ट
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 8:13 AM

पुणे | 7 सप्टेंबर 2023 : देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्या पावसावर राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा मोठा खंड पडला. पावसाच्या ब्रेकमुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात पावसाला सुरुवात

पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली, मालाडसह अनेक भागात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ७ आणि ८ तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

कुठे दिला यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे.

हे सुद्धा वाचा

धुळ्यात पाऊस

धुळे जिल्ह्यात 17 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली. धुळे शहरासह, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजरी लावली. जळगाव जिल्ह्यांत रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे बळीराजा हा सुखावला आहे. वाशिम जिल्ह्यात बुधावारी रात्री सर्वत्र जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे खरिपाच्या सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना जीवदान मिळाले आहे.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...