Kokan Flood photos: कोकणाला पावसाने झोडपले, राजापूरला पुराचा वेढा, चिपळूणकरांची भीती वाढली, सावित्री नदीची पाणीपातळीही वाढली

चिपळूणातही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. चिपळूणचे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चिपळूमकरांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kokan Flood photos: कोकणाला पावसाने झोडपले, राजापूरला पुराचा वेढा, चिपळूणकरांची भीती वाढली, सावित्री नदीची पाणीपातळीही वाढली
कोकणात पूरस्थिती Image Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 8:30 PM

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यासह (Ratnagiri rain)कोकणाला सकाळपासून पावसानं झोडपून काढलय. अनेक भागात मुसळधार पाऊस (heavy rain)पडत आहे राजापूरच्या (Rajapur)अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्‍याची तारांबळ उडाली आहे. अर्जुना नदीच्या  पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर जवाहर चौकात पाणी शिरलंय तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी शिरलंय. कोदावली आणि अर्जुना नदिनं पात्र सोडल्यानं पुरजन्य परिस्थिती निर्माण झालीय. राजापूरला पुरानं वेढलय.

राजापूरला पुराचा वेढा

लांजा तालुक्यात घरांत शिरले पाणी

मुंबई गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी बसस्टॉप जवळील लोक वस्ती मध्ये पाणी घुसले आहे. या मुळे नागरिकाची तारांबळ उडाली आहे.तीव्र उतरावरील रस्त्याला गटार नसल्याने हे पाणी रहिवासी वस्ती मध्ये शिरले आहे. लांजा आपत्कालीन कक्षाला सूचना मिळताच सार्वजनिक बांधकाम अधिकारी तलाठी घटनास्थळी पोचले आहेत.रस्त्यालगत असलेल्या 3 दुकाने पाण्याखाली गेली होती. दुकानांमधील सामानाचे नुकसान देखील झालेले आहे

लांज्यात दुकानात शिरले पाणी

चिपळूणकरही धास्तावले

चिपळूणातही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. चिपळूणचे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चिपळूमकरांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, इतकीच ते प्रार्थना करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

कोकण रेल्वेचे रुळ पाण्याखाली

महाडमध्येही सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ

महाड नगरपालिकेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावित्रीचे नदिची पातळी चार पूर्णांक वीस मीटर एवढी झाली आहे, पोलादपूर महाबळेश्वर खोऱ्यामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी रोडगे यांनी दिली आहे. पाण्याची पातळी पाच मीटर पोचल्यानंतर महाड शहरात भोंगा वाजवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे

भातशेतीत पाणी

गोवा राज्यात पावसाचा हाहाकार

गोव्यातही अनेक सखल भागात पाणी शिरल्यान नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मडगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आज दिवसभर गोव्यात मुसळधार पाऊस झाला आहे. केपे, कुडचडे भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. अनेक ठिकाणी उपाय योजना नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. पेडणे, म्हापसा परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.

अनेक ठिकाणी घरांत पाणी

'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.